जि. प. अडेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

जि. प. अडेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक_

वैशाली अंड्रस्कर, प्रतिनिधी

चंद्रपूर: जिल्हयातील गोंडपिपरी येथे आज दिनांक 2 डिसेंबर 2022 रोज शुक्रवार ला जि. प. प्राथमिक शाळा अडेगाव येथे शालेय उपक्रमाअंतर्गत वनराई बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अलका नागपुरे, मु. अ. श्री. किशोर भोयर सर, कु .शीतल आकोजवार, सहाय्यक शिक्षिका, श्री. राजेश लोणकर, सहायक शिक्षक, शालेय मुख्यमंत्री शुभम झाडे, वर्गमंत्री आरोष नागपुरे, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. विशाखा लोणारे, तन्वी नागपुरे व वर्ग 1 ते 5 चे विद्यार्थी उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांनी बंधारा बांधून मुबलक पाणी साठा उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकऱ्यांनी आभार मानले. माननीय गटशिक्षणाधिकारी भसारकर सर,केंद्रप्रमुख निमकर सर यांनी अडेगाव चमूचे कौतुक करत पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles