
पिंपळगाव केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
_केंद्रप्रमुख सिडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण_
वर्धा: जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील पिंपळगाव केंद्रात केंद्रांतर्गत एकूण ०९ उच्च प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांचे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आज २/१२/२०२२ रोजी आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रप्रमुख कवडू सिडाम यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवून करण्यात आले. प्रसंगी पिंपळगाव शालेय व्यस्थापन समितीचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश कडवे, शा.व्य.स, उद्घाटक किसनजी शेंडे, सरपंच, मार्गदर्शक कवडू सिडाम, केंद्रप्रमुख, प्रमुख अतिथी जुगनाकेताई, उपरसपंच, प्रमुख पाहुणे भाग्यशाली कुटे तसेच शा.व्य. समितीचे सदस्य परमेश्वर राऊत, प्रदीप घुमे, विनोद बोरेकार, प्रमोद विहाळे, मारोतराव चुदरी, राजू पेंदाम, विजय कोरेकार, आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रप्रमुख सिडाम यांनी प्रास्ताविक मार्गदर्शनानंतर उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना शपथ दिली.
पिंपळगाव येथील महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन सुखदेव भलावी, विकास होले, रेश्मा आत्राम, नितीन बांडगे यांनी केले. याप्रसंगी केंद्रातील ९ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा येथील सर्व मुख्याध्यापक व सहशिक्षक उपस्थित होते. आयोजित क्रीडा स्पर्धेत पंच, परीक्षक म्हणून शंकर कोल्हे, काशीनाथ थुटे, जुनघरे सर, मोरारजी राठोड, रामराव मेहेत्री, रत्नाकर जिरेकाटे, नरड सर, बाबाराव पावडे, कांबळे सर, तसेच महिला पंच म्हणून लिना ठाकरे, शिल्पा बावनकुळे, दिपा पिसरवार, खुडसंगे, मोंढे मैडम आदींनी काम पाहिले.
आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात समस्त गावकरी, क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुखदेव भलावी यांनी केले तर आभार विकास होलेत यांनी मानले. पुढील सप्ताहानंतर बीटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे केंद्रप्रमुख यांनी समारोपादरम्यान जाहीर केले.
क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा अंतिम निकाल
सांघिक विजेते संघ:
कबड्डी: प्राथमिक मुले, पिंपळगाव. प्राथमिक मुली, सायगव्हाण. उच्च प्राथमिक मुले,पिंपळगाव . उच्च प्राथमिक मुली सावंगी.
खो खो: प्राथमिक मुले, अंतरगाव. प्राथमिक मुली अंतरगाव, उच्च प्राथमिक मुले अंतरगाव, उच्च प्राथमिक मुली, अंतरगाव
लंगडी: प्राथमिक मुली, पिंपरी, उच्च प्राथमिक मुली, पिंपरी
पोवाडा व समरगीत: साखरा
नाट्यछटा: साखरा
नृत्य: पिंपळगाव
नाटिका: पिंपळगाव
बँड पथक व कवायत: अंतरगाव
वैयक्तिक खेळ उच्च प्राथमिक गट अंतिम निकाल
लांब उडी मुले: सायगव्हाण
लांब उडी मुली: पिंपरी
थाळी फेक मुले: सावंगी
थाळी फेक मुली: सावंगी
गोळा फेक मुले: पिंपळगाव
गोळा फेक मुली: पिंपळगाव
१०० मीटर दौड मुले: पिंपरी
१०० मीटर दौड मुली: पिंपरी
२०० मीटर दौड मुले:
२०० मीटर दौड मुली: सावंगी
बुद्धीबळ मुले: सावंगी
बुद्धीबळ मुली: सावंगी
वैयक्तिक खेळ प्राथमिक गट अंतिम निकाल
लांब उडी मुले: सायगव्हाण
लांब उडी मुली: पिंपरी
थाळी फेक मुले: सावंगी
थाळी फेक मुली: सावंगी
गोळा फेक मुले: रासा
गोळा फेक मुली: रासा
१०० मीटर दौड मुले: रासा
१०० मीटर दौड मुली: केसलापार
२०० मीटर दौड मुले: पिंपरी
२०० मीटर दौड मुली: पिंपरी