आपुलीच प्रतिमा होते आपलीच वैरी….!; वैशाली अंड्रस्कर

➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿

*✍️परीक्षणाच्या निमित्ताने…*

➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿

*आपुलीच प्रतिमा होते आपलीच वैरी….!*

*ओळख पहिली गाली हसते*
*सांग दर्पणा कशी मी दिसते ?*

*संदर्भिय गीत एक प्रणयगीत जरी असले तरी आरशातील प्रतिमेशी आपली ही पहिली ओळख. नटणे-मुरडणे, वेगवेगळी वेशभूषा-केशभूषा बघता बघता चेहऱ्यावर आलेली सुरकुती आणि केसांतील पांढरी बट आपलीच प्रतिमा आपल्याला ‘वैरी प्रतिमा’ कधी होते कळतच नाही…!* 😂

*हे जरा विनोदी अंगाने घेतले तरी जीवनाच्या रंगमंचावर व्यक्तिमत्त्वातून घडणारे प्रतिमा दर्शन हा माणसाच्या गुणावगुणांचा आरसा असतो. आपण माणसांची वैशिष्ट्ये ठरवतो, चांगला-वाईट, दुष्ट-सुष्ट अशा अनेक प्रतिमा अवतीभवतीच्या माणसांबाबत आपल्या मनात तयार होत असतात. त्या प्रतिमेला जपतच आपली वाटचाल सुरू असते. कधी कधी मात्र अनपेक्षितपणे त्या प्रतिमेला तडा जातो. ज्यावर भरभरून विश्वास ठेवला तो विश्वासघात करतो तर ज्याच्यावर कधी विश्वास ठेवला नाही तोच तारणहार होतो…. आणि जीवन हे असंच असतं…’जीवन चलने का नाम…चलते रहो सुबह शाम’ नाही का..?*🤗

*आणि एक गोष्ट लोकांनी आपल्याबद्दल कितीही प्रकारच्या प्रतिमा जरी तयार केल्या तरीही आपल्या ‘स्व’ ची प्रतिमा मात्र आपली आपणच जपायला हवी. कवीवर्य जगदीश खेबुडकर यांनी म्हटल्याप्रमाणे “स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी”, कोणाच्या मनात आपल्याबद्दल कशीही प्रतिमा झाली तरी चालेल, पण आपल्या मनातील स्वतः बद्दलची प्रतिमा मात्र कायम जपा. स्वार्थ, हेवेदावे यांना विसरून स्वतःच्या आनंदासाठी जगा. जग आपोआपच सुंदर होईल, आपलीच ओळख आपल्याला नव्याने होईल आणि आपण गुणगुणायला लागू…!*

*ओळख पहिली गाली हसते*
*सांग दर्पणा कशी मी दिसते ?*

*आज मराठीचे शिलेदार समूहात मुख्य प्रशासक माननीय राहुलदादांनी ‘वैरी प्रतिमा’ हा विषय ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेकरीता दिला. त्यांना सर्वात आधी माझा प्रश्न, ‘काय हो, असाकसा हा विषय..?’ खरंच सांगते मला नाही आवडला हा विषय थोड्या वेळापुरता. पण जेव्हा त्या विषयाच्या अंतरंगात शिरू लागले तसतसा तो मला… माझ्या शब्दांना खुलवितच गेला. जसे तुम्ही मराठीचे शिलेदारांनी कविता चारोळीतून खुलविला. सर्व सहभागी शिलेदारांचे मनापासून अभिनंदन…लिहित राहा व्यक्त होत राहा… नाविण्यपूर्ण लिहिण्याच्या नादात मात्र अंतरंगातील भावना विसरू नका…तरच सकस साहित्य निर्माण होईल…उगाचच ओढून ताणून जुळविलेल्या शब्दांपेक्षा भावना कधीही श्रेष्ठ ठरतील… सर्वांच्या भावी लेखनास हार्दिक शुभेच्छा…!*

➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔖🌸🔖♾️♾️♾️♾️

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles