जि. प. कन्नड शाळा नं.1 मध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार

जि. प. कन्नड शाळा नं.1 मध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संभाजीनगर: जि. प. कन्नड नं.1 मध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पं.स.कन्नड शिक्षण विभागाकडून विषय समावेशीत शिक्षक कडुबा भुसारी यांनी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार केला. शाळेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांचाही सत्कार यावेळी झाला. गटशिक्षणाधिकारी शेषराव गंडे,व प्रभारी केंद्रप्रमुख दिलीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दि.3 डिसेंबर रोजी कन्नड नं.1 व 3 या शाळेमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली तसेच तीन डिसेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा, तसेच उद्या पासून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,बक्षीस वितरणचा समावेश करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात कन्नड नं.१ चे सतीश कोळी,श्रीम.कल्पना सुर्यवंशी,श्रीम.सबा अन्सारी,कन्नड नं.३ च्या श्रीम.अर्चना पाटील, श्रीम. सुवर्णा गायके सह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles