
जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबिर स्व. देवकीबाई बंग विद्यालय येथे संपन्न
नागपूर/ हिंगणा:- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळनी समिति नागपूर व डॉ. बाबासाहेब आम्बेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, समतादूत प्रकल्प नागपूर यांच्या वतीने स्व.देवकीबाई बंग कनिष्ठ महाविद्यालय व नेहरू कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांकरता जात प्रमाणपत्र पडताळणी सुलभ प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर व जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्व प्रथम समता पर्व निमित्ताने मान्यवारांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य सुरेंद्र पवार यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात लागणारे सर्व कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज करण्यापासून ते विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळेपर्यन्तची सर्व सुलभ प्रक्रिया समजावून सांगत सखोल व सविस्तर अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विधी अधिकारी शिवशंकर दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र बद्दल सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नागपूर जिल्हा परिषद सदस्य दिनेशजी बंग यांनी उपस्थिती राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजक समतादूत सतीश सोमकुंवर यांनी विद्यार्थ्यांना बार्टी उपक्रमा बद्दल माहित देवून मार्गदर्शन केले.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य सुरेंद्र पवार,विधी अधिकारी शिवशंकर दाभाडे, जिल्हा परिषद सदस्य दिनेशजी बंग, हिंगणा पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाळे प्राचार्य नितीन तुपेकर, प्राचार्य शशिकांत मोहिते, पर्यवेक्षक अतुल कटरे, पर्यवेक्षक निशिकांत पोकळे, नोडल अधिकारी कैलास पांडे, समतादूत सतीश सोमकुंवर, समतादूत अमोल खवसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तर्फे नेहरू विद्यालय व स्व. देवकीबाई बंग विद्यालयांना भारतीय संविधान ग्रंथ भारतीय संविधानाची उद्देशिका भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता बार्टी समतादूत सतीश सोमकुवर, समतादुत अमोल खवसे प्राचार्य नितीन तुपेकर, प्राचार्य शशिकांत मोहिते, पर्यवेक्षक अतुल कटरे, पर्यवेक्षक निशिकांत पोकळे, नोडल कैलास पांडे, सहाय्यक शिक्षक सचिन भांडारकर, जीवन भोयर, विनोद वानखेड़े, नितीन काटोलकर, इर्शाद सर, श्वेता तुपेकर, पूजा नारनवरे रोशन अंजीकर यांनी सहकार्य केले.
तसेच हिंगणा तालुक्यातील सर्व विज्ञान महाविद्यालयाचे नोडल अधिकारी राहुल तिड़के, अनिल चनकापुरे,प्रशांत नेवारे,अमित लिल्हारे, सौ. सुप्रिया निकोसे, रमेश लोहकरे, भूषण कापसे, रूपेश गजभिये, राहुल तरारे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता तुपेकर व पूजा नारनवरे यांनी केले तर आभार समतादूत सतीश सोमकुंवर यांनी मानले.