
शशी थरूर घेणार कॉंग्रेसशी फारकत; राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता?
नवी दिल्ली: शशी थरूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले तर आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू. असं पीसी चाको यांनी म्हंटल. शशी थरूर कॉंग्रेसशी फारकत घेत असून त्यांना राष्ट्रवादीची आफर असल्याचे समजते. काँग्रेस पक्षाने त्यांना नाकारले तरी शशी थरूर हे तिरुअनंतपुरमचे खासदार राहतील. काँग्रेस थरूर यांच्याकडे का दुर्लक्ष करत आहे हे मला कळत नाही असेही ते म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेलं खासदार शशी थरूर हे काँग्रेस मध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. याशिवाय त्यांना केरळ मध्ये पक्षांतर्गत विरोधाचा सुद्धा सामना करावा लागतोय. त्यातच आता राष्टवादी काँग्रेसने थरूर यांना थेट ऑफर दिली आहे. शशी थरूर यांनी राष्ट्रवादीमध्ये यावे, तुमची तिरुअनंतपुरमची खासदारकी कायम राहील अशी ऑफर केरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पीसी चाको यांनी दिली आहे.
दरम्यान, चाको यांच्या या ऑफरनंतर खुद्द शशी थरूर यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नाही. पक्षप्रवेशाबाबत पीसी चाको यांच्याशी कोणताही चर्चा झालेली नाही,’ असे शशी थरुर म्हणाले आहेत. मी केरळ युनिटमधील कोणावरही नाराज नाही. ते पक्षातील कोणाच्याही विरोधात बोलले नाहीत किंवा सूचनांविरुद्ध कृतीही केली नाही.असेही ते म्हणाले.