जि, प. उच्च प्रा. शा. सायगव्हाण येथे महामानवास अभिवादन

जि, प. उच्च प्रा. शा. सायगव्हाण येथे महामानवास अभिवादन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_६६ वा महापरिनिर्वाण दिनी विद्यार्थ्यांचा वाचनाचा संकल्प_

वर्धा/समुद्रपूर: पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सायगव्हाण येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी ज्ञानभांडार वाढविण्यासाठी नियमित वाचन करण्याचा संकल्प केला.

सायगव्हाण येथील आयोजित अभिवादन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून अरूण धांडे, प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी सेविका चित्रा सोनवणे, प्रमुख मार्गदर्शक मुख्याध्यापक पाटील आर जी व आर बी मेहेत्री उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

मार्गदर्शन करतांना पाटील यांनी वाचन संस्कृती वाढीस लागावी याकरिता विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाचा संकल्प करण्याची गरज असल्याचे सांगातले तर, मेहेत्री सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्याकडून प्रेरणा कशी घेता येईल यावर मंथन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पाटील सर यांनी केले तर आभार मेहेत्री सर यांनी मानले. या अभिवादन कार्यक्रमात सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles