यूनीयन बँक कर्मचा-यातर्फे महामानवास अभिवादन
नागपूर: शहरातील यूनीयन बँक मानेवाडा चौक शाखा येथे आज दि ६ डिसेंबर रोजी विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य डॉ बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी मानेवाडा शाखा प्रमुख शोभित घोरमारे , पियुष मेश्राम ,संदिप मसराम, गगन पांडा, चेतन कवळते ,प्रेरणा डोंगरे, किर्तीमाला जामदापुरे ,प्रणाली शेंद्रे, राजेश खेवाले, लोकेश सयाम, गगन पांडा इत्यादी बँक कर्मचारी या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित होते.