जीवन समृद्ध करणारी बहुभाषिक संमेलने; डाॅ संगीता बर्वे

जीवन समृद्ध करणारी बहुभाषिक संमेलने; डाॅ संगीता बर्वे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे.दि.3 डिसें. (प्रतिनिधी.) : “एक भाषा म्हणजे एक राज्यच असते. त्याअर्थाने जीवनाचा पैस वाढविण्यासाठी,जीवन समृद्ध करण्यासाठी अशाप्रकारची बहुभाषिक संमेलने खूपच उपयुक्त असून विविध भाषेतील काव्यवाचन हा एक सुखद सुंदर अनुभव आहे ” असे उद्गार प्रसिध्द लेखिका व कवयित्री डाॅ. संगीता बर्वे यांनी अखिल भारतीय साहित्य परिषद आयोजित बहुभाषिक संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना काढले. याप्रसंगी बोलताना त्या पुढे म्हणाल्या,” अशाप्रकारच्या संमेलनांमुळे विचारांची देवाणघेवाण होऊन परस्परातील कटुता कमी होण्यास मदत होते,भाषिक सौहार्द वाढून प्रांतिक ऐक्य वाढीस लागते..” असे मत त्यांनी या संदर्भात आग्रहपूर्वक नोंदवले.

अखिल भारतीय साहित्य परिषद,पुणे शाखा व रोटरी क्लब ऑफ पुणे, कर्वेनगर भाग यांनी संयुक्तपणे हे बहुभाषिक कविसंमेलन संपन्न झाले. या संमेलनात मराठीसह विविध भाषिक कवी सहभागी झाले होते. भारतीय विचार साधनेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कविसंमेलनात विश्वनाथ शेट्टी यांनी तुळू , रेखा सिंह यांनी भोजपुरी, इंदिरा सलियन यांनी कन्नड , दीपक करंदीकर,मेधा करमरकर, रविंद्र करमरकर, विलास ऊर्फ बाबा ठाकुर यांनी मराठीत, विनीत शंकर यांनी ऊर्दु, इंदिरा पुनावाला यांनी सिंधीत,साहिल आर यांनी इंग्रजीत व देवेंद्र जानी यांनी राजस्थानी भाषेतील काव्यरचना सादर करुन कविसंमेलनात रंगत आणली. जेष्ठ कवी व हिंदी परिवारचे संस्थापक संजय भारद्वाज यांनी या कविसंमेलनाचे खुमासदारपणे संचालन करुन स्वत: देखिल हिंदी भाषेतील कविता सादर केल्या.

कविसंमेलनाच्या प्रारंभी डाॅ. धनंजय इंचेकर यांनी सरस्वतीवंदना म्हटली. प्रास्ताविक अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डाॅ अनुजा कुलकर्णी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ पुणे, कर्वेनगरच्या सदस्या डाॅ. लढ्ढा यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. या कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक, प्रसिध्द अनुवादक डाॅ. उमा कुलकर्णी, प्रा. श्याम भुर्के, प्रा. चारुदत्त निमकर, रोटरी क्लब ऑफ पुणे,कर्वेनगरचे अध्यक्ष डाॅ. दिलीप कुलकर्णी, श्री.बर्वे हे मान्यवर उपस्थित होते. निमंत्रित रसिक श्रोत्यांनी या बहुभाषिक कवी संमेलनाचा मुनमुराद आनंद घेऊन भरभरून दाद दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles