

डिंपल यादवचा दणदणीत विजय; भाजप उमेदवाराचा अडीच लाख मतांनी केला पराभव
उत्तरप्रदेश: मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव यांनी भाजप उमेदवार रघुराज शाक्य यांचा २ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
डिंपल यादव यांचे सासरे दिवंगत मुलायमसिंह यादव यांचा विक्रम आजही कायम आहे. मुलायम सिंह यादव यांनी 2014 मध्ये ही जागा 3.64 लाख मतांच्या फरकाने जिंकली होती. हा विक्रम आजही कायम आहे. डिंपल यादव यांच्यासमोर भाजपचे उमेदवार रघुराज शाक्य लढत आहेत.