
महापरिनिर्वाण दिनी भव्य रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद
नागपूर : प.पु.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे व आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बालक्रिष्ण न्यूरो मल्टि सोशालिटी, क्लिनीक व पॅथालाजी लॅब याच्या तर्फे आयोजित केलेल्या ७ डिंसेबर ला बॉलक्रिष्ण न्युरो मल्टिस्पेशालिटी क्लिनीक, प्लॉट नं. ४५, दुसरा माळा, दोडके भवन, जुनी शुक्रवारी रोड, मनोज, मेटलच्या बाजूला, सक्करदरा चौकात सकाळी शिबिराचे उद्घाटन पुज्यनिय आर्य नागार्जुन भन्ते सुरई ससाई यांच्यां हस्ते करण्यात आले.
यावेळी शिबिरात नाक, कान, घसा, सामान्य रोग, बालरोग व नेत्ररोग इत्यादी रोगांवर तज्ञामार्फत’ उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. रक्तदान शिबीरात सहभागी होऊन आरोग्य तपासणी शिबीराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला. त्यावेळी शिबिरात आलेल्यांना आयोजकांनी फ्रुटी, नास्ता, चहा, बिस्किटची व्यवस्था केली होती. या शिबिराचा लाभ सर्वांनी घेतला व कार्यक्रम पार पडला. असे सुषमा भुजाडे ( मेश्राम ) यांनी सांगितले.