गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीस एकनाथ शिंदे लावणार हजेरी

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीस एकनाथ शिंदे लावणार हजेरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: आज राज्याचे मुख्यमंत्री नागपुरात दाखल झाले असून, उद्या समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. एकनाथ शिंदे आज आढावा घेत असून, नुकताच गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. याच निवडणुकीत गुजरात भाजपने सर्वाधित 156 जागांवर विजय मिळवुन इतिहास रचला आहे. त्यानंतर आता तिथे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय.

गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याच नेतृत्वात पुन्हा नवं सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट आहे. विशेष म्हणजे नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 12 डिसेंबरला सोमवारी आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे.

माहितीनुसार, गुजरातमध्ये बहुमतासह भाजप सरकार स्थापन करणार आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. NDAचा मित्रपक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांना भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आल आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना शपथविधीचं निमंत्रण आल्यानंतर महाराष्ट्रात सर्वसामान्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आल आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles