‘मानवतेचे आदर्श पुजारी व्हा’; प्रा. तारका रूखमोडे

‘मानवतेचे आदर्श पुजारी व्हा’; प्रा. तारका रूखमोडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण_

*विश्वची घर*
*लीळाचरित्र सार*
*जिवनोद्धार*

प्राणी हे निसर्गाचेच अपत्य. निसर्ग कुशीतच मानवप्राण्यांचे वाढते जीवनत्व. पण काही शारीरिक व बौद्धिक फरकामुळे निवाऱ्याचे मात्र ह्यांचे वेगवेगळे अस्तित्व.तरीही पूर्वीच्या शतकात नागर व आरण्यक संस्कृती विहार करायच्या स्वच्छंद. यादवकालीन भारत तर उजवा ठरायचा या संस्कृतीत..!

*श्री चक्रधर*
*खेळे प्राणीमात्रांशी*
*निष्ठा कर्माशी*

व्याघ्राचे बछडे कसे सर्वज्ञाच्या मांडीवर स्नेहकुशीच्या अभ्रछायेत विसावलेले. प्राण्यांचं गोकुळच जणू ..’गोकुळ म्हणजे मुलाबाळांनी भरलेलं घर’ या गोकुळात हिंस्त्रत्व विसरून कसे सुखाने लेकरं विसावण्याचं सुखचित्र. खरंच लीळाचरित्रातील श्री चक्रधर स्वामींचे प्राणीप्रेम म्हणजे समानतेची व मानवतेची भावना दर्शवणारेच. बायबल मधेही कोणे एकेकाळी ‘नोहाज आर्क’ या जहाजावर सगळे पशुपक्षी एकत्र मजेत राहत होते, अशी गोष्ट मी वाचली होती. किती सुंदर अनुभूती ती. ‘दासबोधातही’ गृहस्थाश्रमाचे महात्म्य सांगताना “जे जे भेटीजे भूत …ते ते जाणिजे भगवंत!!!” इतका परमोच्च भाव आपल्या सानिध्यात आलेल्या प्राणीमात्रांविषयी सांगितलेला, हाच मानदंड पुढे संत गाडगे महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले यांनीही अंगीकारलेला. भूतदया करणे म्हणजेच ईश्वराला जाणणे.

पण हल्ली मानवी हव्यासामुळे आरण्यक संस्कृतीवर व त्यांच्या अधिवासावर झालेल्या अतिक्रमणामुळे प्राणी व मानव यांच्यात द्वंद्वाची परिस्थिती निर्माण झालेली दिसते. एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो हे तर निसर्गचक्र तत्व, पण बुद्धी क्षमताप्राप्त मनुष्य प्रत्येक वेळी आपलेच सूत्र निर्माण करून नैसर्गिक घडणाऱ्या क्रियांमध्ये सहभागाचा विनाकारण ठेका दर्शवतो. प्राण्यांची लालसेपोटी हत्या करतो. किती आपण माणुसकी शून्य..!

चित्र बघून मला आठवण होतेय ती ‘प्रकाश आमटे’ या मानवतेच्या आदर्श पुजाऱ्याची. आमटे दाम्पत्य दुर्गम भागात गेले; तेव्हा आदिवासी अंतर राखून होते. ते एकाकी पडले. तेव्हा तिथे भेटलेल्या जंगली प्राण्यांनी त्यांना लळा लावला, त्यांनी अनाथ झालेल्या प्राण्यांसाठी ‘गोकुळ’ सुरू केले. नागर व आरण्यक संस्कृतीच्या संगम घडवून आणायचा असेल, तर आमटेंसारखे भगीरथ पाहिजेत. जे वादळ वाऱ्याची टक्कर देत स्तूपासारखे अविचलपणे या प्राण्यांच्या मागे उभे राहतील. आपल्याला नाही का प्रकाश आमटे ने दाखवलेल्या प्रकाश वाटेवर चालता येणार? प्रेमानं काय नाही जिंकता येत जगात? फक्त आपण मनापासून माया लावावी लागते .मग हिंस्त्र पशूही अंगा खांद्यावर सोबतीने अंगणात खेळतील, हेच तर या बोलक्या चित्राचे मर्म आहे..!

अरण्यातील त्या वस्तीपर्यंत जरी आपणास प्रत्यक्ष पोचता आलं नाही; तरीही शब्द माध्यमातून या भूमीवर कल्पनारुपी आशयाचे बीज घेऊन जाण्यासाठी व लेखणीतून मानवतेचे रोपटे उगवण्यासाठी व त्याचे सुंदर मर्मरूपी प्रतिध्वनी सर्व वाचकांच्या व पुढच्या पीढीच्या मनी रुजवण्यासाठी.. अवघे विश्वची माझे घर ..या मानवतावादी दृष्टिकोनातून लेखणी सरसावण्यासाठी कदाचित आदरणीय राहुल सरांनी हे चित्र दिलेलं. अनेक प्रतिभावंतांनी उत्तम रचना रेखाटल्या,आशय मांडण्यात यशस्वी झाले,तरी पण चित्र ओळखण्यात जरा कमी पडलेत. लीळाचरित्रातील श्री चक्रधर स्वामींच्या भटकंतीच्या काळात ज्या लीळा रचल्या गेल्या त्यातील ते चित्र होतं. त्यावर काव्य रचायचं होतं, मानव्यतेची जपणूक करणाऱ्या रचना अनेकांनी केल्या. सर्वांचंच मनापासून अभिनंदन💐💐

*थोडंसं मनातलं –*

आ. राहुल सर आपल्याला वेगवेगळी क्षितिजे गाठण्यासाठी त्यांच्या उत्तुंग कल्पनाशक्तीतून किती सुंदर संदर्भ असलेले चित्रविषय देतात, कविता अर्थाच्या असंख्य वलयांनी आशयघन करून सच्चेपणाच्या व गहन अर्थाच्या झळाळी बळाने चमकू द्या. भाषेचा लहेजा सांभाळून मूळ आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.असेच लिहिते व्हा. आदरणीय राहुल सरांनी मला हायकू लेखन परीक्षणाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे हृदयस्त ऋणाभार.

प्रा. तारका रूखमोडे
अर्जुनी मोरगाव, जि गोंदिया
परीक्षक, सहप्रशासक, कवयित्री, लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles