शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील विजेत्यांच्या कविता

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : हसरी पापणी☄*
*🍂शनिवार : १० / डिसेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*हसरी पापणी*

सखीच्या नात्यामधलं
खळाळत वाहते पाणी
क्षीतीजाच्या पलीकडं
अवीट गोड गुणगाणी…

डोंगर द-या हिरव्या रानी
हुंदडत फिरलो कितीदा
नाही थकले आपुले पाय
पाखरांचा थवा करी मलीदा….

हसणे गाणे चालूच आमचे
झोक्यावरी मैनेचा ताल
गाऊन सुर एकात एक
सखा सखीची मंद चाल..

सखे तुझ्या डोईचा पदर
वा-यायासंगे हेलावतो
पावसाच्या सोबतीला
मधूर गीत गात बसतो…

तुझ्या कंठातूनी वाहीले
गोड गळा मधूर गाणी
रोज नव नवी मेजवाणी
लाजली ती हसरी पापणी…

*शिवाजी नामपल्ले*
अहमदपूर जि.लातूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿😃👩🏻😀➿➿➿➿
*हसरी पापणी*

हसरी पापणी तुझी
मना माझ्या मोहविते
बोबड्या बोलाने तुझ्या
घर माझे फुलविते

छोटीशी परी माझी
आली सोनपावलापरी
आनंदाची बरसात
झाली माझ्या घरी

टपो-या डोळ्यांनी
हळूच मला खुणावते
दुडूदुडू धावण्याने
अंगण बहरुन जाते

नाजूक तुझ्या हातांनी
जेव्हा धरतेस माझे हात
काऊचिऊच्या गोष्टींनी
भरवते दुधभात

बोबड्या तुझ्या बोलांनी
हरपून जाते भान
उदासल्या मनासही
भासते सारे काही छान

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😃👩🏻😀➿➿➿➿
*हसरी पापणी*

प्रेमवेड्या या दिलाची
एक सुंदर साजणी
गर्द छायेत फुलली
तिची हसरी पापणी

असं हे मनपाखरू
तिला पाहुनी स्थिरावे
अशी सौंदर्याची खाण
सूर हृदयी उठावे

स्मित हास्य मुखावरी
उठे गोडवा मनात
तिच्यामुळे आठवेना
कुणी दुसरी स्वप्नात

गाली ती नाजूक खळी
करी घायाळ देहाला
तिचा मंजुळ आवाज
सुखावतो या कानाला

देई नेहमी आनंद
तिची हसरी पापणी
धन्यवाद त्या देवाचे
आली ती माझ्या स्मित

*कुशल गोविंदराव डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😃👩🏻😀➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*हसरी पापणी*

हसरी पापणी भिडते
मनीच्या भावना क्षणबर गाली
हृदयात कप्प्यात साठवले
गुलाबी खळी फुलली गाली

शब्द मनातले ओठांवरती
आनंदाने ,उत्साहाने ,हर्षभरान
पडतात नव कवीच्या पदरी
तेव्हाच हासते पापणी आनंदान

गालावरची खळी डोळ्यात धुंदी
मनात विश्वास आनंद लहरी
देव आले दारी करु पणत्यांची रास
आनंदाने उत्साहाने करु साजरी

डोळ्यातील पापण्यांनी सावरलं
माझ्या डोळ्यांचे पारणे फिटेल
मनी चैतन्य निर्माण झाले
हृदयातील अतंरीच्या कप्प्यात

आदर राखतो शब्दा शब्दातून
ओठावर हसू येईल कायमतरी
हसरी पापणी भिडते समोरील
आनंदाने उत्साहाने कायमतरी

*सौ कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😃👩🏻😀➿➿➿➿
*हसरी पापणी*

“बस्स,,! झालं आता तुझ्या
अबोलपणाची किती परीक्षा?”
“कुठंवर करू ग मी आता,
तुझ्या इशाऱ्याची प्रतिक्षा!”

“तू बोलू शकत नसलीतरी
समजते मज नयनाची भाषा”
“जरी तू मज नाही बोललीस
तरीही सोडली नाही मी आशा”

“तू जेव्हा मज दिसते तेव्हा
भिजतात डोळे माझे अश्रूंनी”
“केला असला जरी मी राग
जा आतातरी थोडा विसरुनी”

“बोलणे तुझे आले कित्येकदा
तुझ्या नाजूक गुलाबी ओठावर ”
” नाही काढलास एकही शब्द
कित्येकदा येऊनही जिभेवर”

“आवडतेस मजला फक्त तू
कारण आहेस लाखात देखणी”
“मिटुनी डोळे एकदा मनसोक्त
दाखव एकदातरी,हसरी पापणी”

*✍️ श्री हणमंत गोरे*
*मुपो:घेरडी, ता:सांगोला,जि:सोलापूर*
*(©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह)*
➿➿➿➿😃👩🏻😀➿➿➿➿
*हसरी पापणी*

उगवताच दिवस
पाखरांची किलबिलाट
सोनेरी त्या किरणाचा
होता वेगळाच थाट

मोत्यांच्या त्या दवबिंदूने
धरती न्याहून निघाली
प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध
अंगणात दरवळली

उघडताच मी दार
पानाफुलेही हसू लागली
हळूच हसरी सकाळ
डोकावू लागली

पाहून हसरी पापणी सुर्याची
नवचैतन्याची उभारी आली
कोवळ्या सोनेरी हास्यात
चिंब चिंब मी न्हायली

हसरी पापणी जणू ती माझ्याचसाठी
आशेचा किरण घेऊन आली
नव्या स्वप्नांची नवी दिशा
जागवून ती गेली…

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😃👩🏻😀➿➿➿➿
*हसरी पापणी*

टीपू दे तारकांना माझ्या मनाने
सांभाळ त्या बटांना जरा धीराने

नागमोडी वळन घेवू नको अशी चालतांना
ठेच लागेल काळजाला चाल जरा धीराने

फुलले नयनात कमळ डोलतो हवेत प्रेमाच्या
भुंगारव होईल आता सुरू पाकळी मीट जरा धीराने

बाग झाली मनाची कलेजा खल्लास झाला
खुणावते हसरी पापणी पण घेतो जरा धीराने

तुझे सौंदर्य आता तनमनात भिनभिनले
तू होणारच माझी म्हणुनच मिठी मारतो जरा धीराने

*डॉ. संजय भानुदास पाचभाई ,नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles