मोदींनी सांगितले अकरा सितारे
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर इथं आज विविध प्रकल्पांचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी या प्रकल्पांचा उल्लेख महाराष्ट्राच्या विकासाचे अकरा नक्षत्र असा उल्लेख केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदनही केलं.
मराठीतून भाषणाला सुरुवात करत मोदी म्हणाले, आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकार्य करताना आपण पहिल्यांदा गणेश पूजन करतो. आज आपण नागपुरात आहोत तर टेकडीच्या गणपतीला माझं वंदन. ११ डिसेंबरचा आजचा दिवस संकष्ट चतुर्थीचा पवित्र दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ सिताऱ्यांचे महान नक्षत्राचा उदय होत आहे