‘मला आनंद याचा होतोय त्यावेळी माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास दाखवला’; एकनाथ शिंदे

‘मला आनंद याचा होतोय त्यावेळी माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास दाखवला’; एकनाथ शिंदेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभास्थळी भाषण केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. तसेच ठाकरे गटावर नाव न घेता टीका सुद्धा केली आहे.

आजचा दिवस आनंदाचा आहे. या मार्गाला आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. अनेक लोकांनी प्रकल्प होऊ नये म्हणून प्रयत्न केले परंतु आम्ही हा प्रकल्प पूर्ण करून दाखवला आहे. हा महामार्ग कमी वेळेत बनला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, मला आनंद याचा होतोय त्यावेळी माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास दाखवला. शेतकऱ्यांमध्ये आम्ही विश्वास निर्माण केला. सर्वात मोठे जमीन अधिग्रहणाचे काम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केले. शेतकऱ्यांना आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे दिली आणि त्यांचा विश्वास जिंकला.

हा महामार्ग जगात नंबर एक बनला आहे. पंतप्रधान मोदी या लोकर्पणासाठी उपस्थित राहिले याचा मला अभिमान आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रकल्पांचा उल्लेख केला आहे. भारताच्या जी २० च्या अध्यक्षपचेसुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles