पॅराडाईज इंग्लिश शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन
प्रा तारका रूखमोडे
गोंदिया- सडक अर्जुनी तालुक्यातीथ सौंदड येथे दि. 6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे संस्थापक संतोष राऊत , मुख्याध्यापिका राजश्री राऊत यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
डॉ बाबासाहेबांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी थोडक्यात प्रकाश टाकला. भीम गीत सादर करण्यात आले. संस्थेचे संस्थापक यांनी सुद्धा त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांचे तत्व विद्यार्थ्यांनी कसं अंमलात आणावे याबद्दल थोडक्यात माहिती दिली. सूत्रसंचालन प्रीती राजस यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. दर्शना डोंगरवार, सौ. उषा बिसेन, सौ. ज्योती नेवारे,सौ. प्राची श्रीवास्तव ,सौ रामटेके, कु. खुशबू यावलकर , खेकरे,लोकेश राऊत, योगराज मस्के यांनी सहकार्य केले.