मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर १४ ते १८ डिसेंबर दरम्यान राहणार बंद

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर १४ ते १८ डिसेंबर दरम्यान राहणार बंद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई : भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुंबईतील गणपती बाप्पाचे प्रभादेवीचे सिद्धिविनायक मंदिर मंदिर पाच दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

सिध्दिविनायक मंदिरातील श्रींच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना तब्बल ५ दिवस घेता येणार नाही. १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२२ या पाच दिवसांसाठी सिद्धिविनायक मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्यामुळे हे मंदिर बंद असणार आहे. त्यामुळे येत्या १४ ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाला जाण्याचा विचार केला असेल, त्यांना त्यांचा प्लॅन बदलावा लागणार आहे. त्याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना १९ डिसेंबरला दुपारपासून घेता येणार आहे. गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्‍यातून दर्शन घेता येईल, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles