चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणा-याची हत्तीवरून मिरवणूक काढणार

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणा-याची हत्तीवरून मिरवणूक काढणार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणा-याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे राजरत्न आंबेडकर यांनी यापूर्वी जाहीर केले होते. आता डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनीही मोठी घोषणा केली आहे.

राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर इथे आयोजित धम्म संमेलनात त्यांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणा-या मनोज गडबडे व त्याचे छायाचित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा निर्णय डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने घेतला आहे.

सांगलीत २३ डिसेंबरला जाहीर सत्कार करणार असल्याचे अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी सांगितले आहे. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणानंतर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचा संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. प्रा. कांबळे म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी अटकेची कारवाई करून लोकशाहीलाच आव्हान दिले आहे.

महापुरुषांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करून मानसिकता स्पष्ट केली आहे, त्यामुळेच शाई फेकून त्यांचा निषेध करणा-या गडबडे यांचे आम्ही अभिनंदन करणार आहोत. २३ डिसेंबरला सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ सांगता होईल. तद्नंतर शाईफेक करणारे गडबडे, विजय होवाळ, आकाश इजद व पत्रकार गोविंद वाकडे यांचा सत्कार केला जाईल, असेही प्रा. कांबळेंनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles