
सिलवासा येथे जिजाऊ जन्मोत्सव व सत्कार सोहळा आयोजन समितीची बैठक संपन्न
_दा. न. हवेलीत दिनांक ७ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव_
सविता पाटील ठाकरे, (कार्यकारी संपादक)
सिलवासा: शहरातील टोकरखाडा ठाकोर काम्पलेक्स येथे आज दिनांक १४ डिसेंबर २०२२ बुधवार रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती सविता पाटील ठाकरे व डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद दादरा नगर हवेलीचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रशांत ठाकरे यांच्या निवासस्थानी मराठा सेवा संघ दादरा नगर हवेली आणि जिजाऊ ब्रिगेड दादरा नगर हवेली यांची संयुक्तपणे कार्यकारणी बैठक पार पडली.
जिजाऊ जन्मोत्सव व सत्कार सोहळा आयोजन समिती कार्यकारणी बैठकीचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त आय.एफ.एस. मा. अनंतराव निकम यांनी भूषविले. त्यांच्या शुभहस्ते शिवपूजन पार पडले. तसेच जिजाऊ वंदना करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
केंद्रशासित प्रदेश, दादरा नगर हवेली येथील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्याचे आयोजित बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना ‘मराठा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविण्यात आले.
दादरा नगर हवेली, सिलवासा येथे दि. ७ जानेवारी २०२३ रोजी आयोजित या कार्यक्रमात जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन आदरणीय निकम साहेब यांनी केले.या प्रसंगी त्यांनी समाजबांधवांनी एकत्र येण्याचे महत्व अवगत करून विविध क्षेत्रात प्रगती साध्य करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
आयोजित बैठकीसाठी कार्याध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष कुंदन बच्छाव, कोषाध्यक्ष राजेंद्र वाघ, संघटक राजेंद्र भामरे, प्रफुल सोनवणे , राजेंद्र वाघ, शरद बोरसे, भरत सोनवणे पुरुषोत्तम पाटील, चंद्रशेखर कणसे प्रामुख्याने उपस्थित होते. आयोजन समिती व कार्यकारणी बैठकीनंतर प्रशांत ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले.