भाव-भावनांना तरी समजून घे ना; सविता पाटील ठाकरे

भाव-भावनांना तरी समजून घे ना; सविता पाटील ठाकरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मला कळतंय रे, माझ्या चिमण्या! तुला गरज आहे आईच्या उबेची. आईच्या त्या भावस्पर्शी स्पर्शाची, मलाही नाही ना सोडवत तुला…पण काय करू??? दोन महिने झालेत. आता मला शाळेत जावंच लागेल ना. रजा तरी किती दिवस मिळणार ? तुझ्या त्या टपोऱ्या डोळ्यांमधून डोकावणाऱ्या हास्याच्या तरंगाने माझा सारा तणाव दूर होतो. पण…पण कर्तव्याच्या ओझ्याने दबली ना मी. कृपया मला समजून घे ना माझ्या बाळा…!!

“अरे पती म्हणून किमान तू तरी मला समजून घे ना. खरे आहे तुझे. नाही केला मी कधी माहेरी स्वयंपाक. पण आता शिकतेय ना मी..!” माझ्या शेजारी नवीनच राहायला आलेल्या जोडप्यातला हा संवाद मी ऐकला. हल्ली रोजच त्यांच्यात कुरकुर असायची पण मी लक्ष देत नव्हती. आपल्याला काय करायचे या रुळलेल्या भावनेनं. पण आज तर त्याने कहरच केला. सरळ हातच उचलला तिच्यावर, तेही शुल्लक कारणावरून. मनाची, कर्तव्याची नसेल जाणीव, पण भाव – भावनांना तरी समजून घे..! मुली शिकतात हो हल्ली, थोडा वेळ द्या त्यांना. नका करू लुडबुड त्यांच्या संसारात. तिही सोडून आली आहे आपल्या आईवडिलांना. कशाला हवे अपेक्षांचं डोंगराएवढं ओझं. तुमच्या मुलीला घेतले ना कुणीतरी समजून, तसं तुम्ही पण परक्याच्या मुलीला समजून घ्या.

होय…….मी अगदी मनापासून प्रेम करते रे तुझ्यावर. माझ्या खऱ्या प्रेमाला समजून घे ना. नाही आवडत मला तो वासनेचा खेळ. लग्नाआधी अजिबात नाही. फुलपाखराप्रमाणे या फुलांवरून त्या फुलांवर उडणारे ही नाही आवडत मला. समजून घे मला, मी तुझीच आहे आणि तुझीच राहणार..! बाळा…..दूर देशी आहेस तू, मला कोण आहे रे तुझ्याशिवाय. मला माहित आहे मोठा साहेब आहेस तू. वेळ नाही तुझ्यापाशी. जास्त काही नाही ना मागत मी. आठवड्यातून नाही जमलं तर, पंधरा दिवसातून किमान दोन-तीन मिनिट तर काढ या आईसाठी, बोलत जा ना माझ्याशी.या वाड्याच्या भिंती खायला उठतात मला..भकास वाटते सारे मला, आईच हृदय आहे हे समजून घे ना मला. देशील ना मला तुझे दोन-तीन मिनिट, मी वाट पाहीन तुझ्या फोनची. समजून घे ना या आईला..!!

‘समजून घे ना’ हा विषय आज बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिला. तसं पाहता समजून घेणारा खरंच खूप मोठा बनतो बाकी तणतण करतात, सारं आयुष्य. आणि मी पणाच्या ओझ्याखाली स्वतःला एवढे गाढून घेतात की त्यातून ते कधी बाहेरच येत नाहीत. कवी मन खूप संवेदनशील असते.प्रत्येकाने आपापल्या परीने या विषयाला न्याय देताना सुदंर सुंदर रचना केल्यात. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन…!!

‘समजून घे ना माय, माझ्या अंतरीची वेदना,
बघायची मला, उदराबाहेरील ईश्वराची रचना’

यासारख्या भावपूर्ण रचना वाचताना मन भारावून गेले…!

‘समजून घे ना तू, मनीच्या वेदना,
झुकलेल्या नयनातील, अस्पष्ट वेदना.’

किती अर्थपूर्ण आहे ना यातला भावार्थ. असो…आज मला मनस्वी आनंद झाला सर्व रचना वाचताना. पुनश्च अभिनंदन आणि पुढील काव्यप्रवासास अनंत शुभ कामना..!!

सविता पाटील ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली
मुख्य परीक्षक/ सहसंपादक/ कवयित्री/ प्रशासक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles