बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील विजेत्यांच्या कविता

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : समजून घे ना🥀*
*🍂बुधवार : १४/ डिसेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*समजून घे ना*

माझ्यासाठी श्रावण होऊन
बरसशी रिमझिम रिमझिम
कधी आषाढी कोसळताना
भिजवीसी माझे रोमरोम

वळिवाचे रुप घेऊनी
भेटसी मला असोशीने
कुशीत तुझ्या गवसते रे
लावण्यमयी रुप देखणे

मृग सरला, सरे श्रावण
अता कशाचे बहरून येणे
भूमी नभास बोले सखया
भेट आपुली अता न होणे

तुझ्या भेटीची ओढ मला
समजून घे ना गे वेल्हाळे
कवेत घेता तुला साजणी
टिपूर चांदणे हे गंधाळे

होते क्षितीज शलाकेवरी
भेट आपुली रोज नव्याने
सामावसी मिठीत अवघ्या
सहस्त्र बाहूंत आवेगाने

युगायुगांचे आपुले नाते
नकळे अजूनी का भावार्थ
सख्या तुझ्या सावलीतची
अस्तिवाला माझ्या अर्थ

*रचना ःवृंदा(चित्रा)करमरकर*
सांगली,जिल्हाः सांगली.
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना*

भाव अंतरीचे मन उधाणलेले
मौन मी तरीही हे ओठ शिवलेले

वादळात शांतता कुठून आणावी
न बोलताच भावनांची ओंजळ खुलावी

नेत्रकटाक्षात दामिनी चमकून जावी
स्वर्ग सुखाची स्वप्ने सजवून घ्यावी

अंबराप्रती ओढ या धरीत्रीची
महासागरा पार करण्या आस सांकवाची

शरदातही फुलती पुष्पे वसंताची
कमलदलात लपती गुंजारव भोवऱ्यांची

का कसे नसेल ठावे हे माझे दुभंगने
नजर जाता कुठे कासावीस जगणे

समजून घे ना तू मनीच्या संवेदना
झुकलेल्या नयनातील अस्पष्ट वेदना

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना*

समजून घे ना माय
माझ्या अंतरीची वेदना
बघायची मला,
उदराबाहेरील ईश्वराची रचना

सागराची विशालता
नदीची निर्मलता
झुळझुळ वाहणारा झरा
धबधबा धो- धो पडणारा

पाचुची हिरवी राने
कोकिळेचे मंजुळ गाने
ईवले-ईवले फुलपाखरे
मोराचे रंगित पिसारे

ढगांचा गडगडाट
विजेचा लखलखाट
सुसाट वाहणारा वारा
पावसा सोबत पडणाऱ्या गारा

सुर्य, चंद्र, तारे सारेच
तुझ्या वदनी श्रवले
पाहू दे एकदा नेत्राने
नटलेली ही वसुंधरा

बघायची मला
उदराबाहेरील ईश्वराची रचना

*सौ वनिता गभने आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.३० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*समजून घे ना*

“अगदी सोपं आहे ग,
घेण्या समजून मजला”
“एवढंही अवघड नाही ग,
समजून घेण्यास तुजला”

“समजून घे ना ग सखे
नको हा अहंकार मनी”
“तूच मला आवडते सदा
एवढंच ठेव ना ग ध्यानी”

“समजून घेणं हे आपल्याच
आता फक्त हाती आहे”
“राग विसरून चांगले प्रेम
करणं आयुष्यभरासाठी आहे”

“झाली असेलही चूक एकदा,
पण आतातरी समजून घे ना”
“झालं गेलं विसरून जा,
हृदयास हृदय जोडूया ना”

“झाला असला तरीही दुरावा
आतातरी समजून घे ना”
“आठवणीने झाले ओले डोळे
अश्रूंना वाट आता तरी दे ना”

*✍️ श्री हणमंत गोरे*
*मुपो:घेरडी, ता:सांगोला,जि:सोलापूर*
*(©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह)*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना*

अनावधानाने कधी कधी
मी चुकेल ,तुही चूकशील
कसा चालेल संसार गाडा
थोड्याला अडून बसशील

माणूस हा चुकीचा पुतळा
चुकने हा जरी मानवधर्म
समजून घे ना सखे मजला
स्मरून मनी केलेले सत्कर्म

तरीही सांगतो तुजला सखे
नको धरु तू असा अबोला
सुखी संसाराची कास धरू
नको करू उगा बोलबाला

समजून घेऊया परस्परांना
जगुयात आनंदी समाधाने
चूक एकमेकांची सावरूया
काढत बसायचे ना उणेदूने

जोडीली नाती शतजन्माची
तुझ्या नि माझ्या रेशीमगाठी
गोडीगुलाबीने राहूया संसारी
रुसवा फुगवा हा कशासाठी

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना*

मज समजून घे ना
कधी केला असेल जरी त्रागा
धरला असेल कधी अबोला
पण नाही हो कधी दिला दगा

मज समजून घे ना
असते मी कामात कधी व्यस्त
मुद्दाम तर करत नसते असं
बसायला मिळत नाही स्वस्थ

मज समजून घे ना
पती पत्नीची जोडली गेली नाती
मुलांचा सांभाळ करण्यासाठी
जीवनाच्या पेटवू प्रत्येक वाती

मज समजून घे ना
चुकांचा अतिरेक नको दूरावा
मीठीत येना जाणुन घेना
कळू दे मला तुझ्या प्रेमाचा पुरावा

*प्रतिभा खोब्रागडे*
*अर्जुनी मोरगाव, गोंदिया*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना*

समजून घे ना
भाव माझ्या मनातला
मनातील सर्व दुःख
सांगू तरी कोणाला?||१||

कुणा न कळली
तूझ्या विरहाची व्यथा
तूझ्या माझ्या प्रेमाची
अजब विरह कथा ||२||

माझ्या डोळ्यात दिसे
तुझ्या प्रेमाची आस
आठवणीत जगताना
तुझ्या अस्तित्वाचा भास ||३||

प्रेमाचा पाझर तुझा
असा कसा आटला
मनाच्या कोपऱ्यात
दुरावा छळे मला ||४||

ये ना परत फिरुनी
तुझ्याविना मी अपूर्ण
संपेल एकाकीपणा
तुझ्या साथीने मी पूर्ण ||५||

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना…..*

तू माझी आई ती माझी पत्नी
दोघींवर माझा सारखाच जीव
ती आहे गं थोडी अविचारी
तूला तरी येऊ दे माझी कीव

इकडे आड तिकडे विहीर
झाली माझी मनस्थिती
माहीत आहे गं तुला खरी
संसारातली सर्व परिस्थिती

तुला वाटते मी तिचा गुलाम
वाटते तिला मी तुझा दास
अश्या अविवेकी विचाराचा
मजला किती होतो गं त्रास

तू आहेस गं वयाने मोठी
अन विचाराने अतिमहान
*समजून घे ना* आई तिला
समझ तुझी मुलगी लहान

तू उचल एक चांगले पाऊल
ती ही टाकेल दुसरा उचलून
रहा सोबत सदोदित चांगले
झालं गेलं सगळं विसरुन

*फुलवरे चंद्रकांत खेमाजी*
*जि.हिंगोली*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना*

समजून घे ना l माझ्या संवेदना l
मनाच्या वेदना l ऐक तरी ll १ ll

अगदी मजेत l तुझिया गर्भात l
अनोख्या स्वर्गात l जन्माआधी ll २ ll

नऊ महिन्याचा l माझा हा प्रवास l
माझा तूच श्वास l क्षणोक्षणी ll ३ ll

मुलगा मुलगी l का हा भेदाभेद l
जन्माची उमेद l मावळती ll ४ ll

छोटीशी मी कळी l उमलण्या आधी l
प्रयोगी औषधी l माझ्यावर ll ५ ll

स्वामी तिन्ही जगी l आई विना दीन l
नशिबी का दिन l आई पाई ll ६ ll

खेळू दे कुशीत l येऊ दे भुवरी l
नको होऊ वैरी l माझी आई ll ७ ll

समजून घे ना l मुलीची अवस्था l
नका मारू आस्था l सांगे गर्भ ll ८ ll

*कुशल गोविंदराव डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना*

*रोज रोज डोईजड*
*मागण्या तुझ्या*॥
*समजून घे ना लेकरा*
*अगतिकतेला माझ्या*॥॥॥॥

*तुझ्या सगळ्या मागण्या*
*किती महागड्या*॥
*समजून घे ना मुला*
*विवशतेला माझ्या*॥॥॥॥

*जरी मित्र आहेत तुझे*
*सगळे तालेवार*॥
*समजून घे ना पुत्रा*
*मला एकवार*॥॥॥॥

*साधेपणाने रहा*
*उत्तम शिक्षण घे*॥
*स्वकमाईतून नंतर*
*इच्छित ते मिळव*॥॥॥॥

*आज बाप तुझा असमर्थ*
*या सुखसोयी द्यावया*॥
*उद्या होऊनी मोठा*
*हवे ते कमव*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख*
*राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना*

नाही गाडी नाही माडी
नाही तुला नवी साडी,
समजून घे ना,प्रेमफुला
हृदयात जपतो तुला…१

आणीन तारे आकाशीचे
स्वप्न माझ्या उरी आहे,
तू का?धावते मृगाजळे
तू पापणीची चंद्रकोर आहे…२

चंद्रमोळी झोपडीत माझ्या
सुख सौख्ये भरे नांदते,
चटनी भाकरीची चव
चाखून बघ ना,प्रिये…३

टाकून घोंगडी
भूवरी निजतो,
पाहून सौख्ये माझे,
देवेंद्र लाजतो…..४

सुखदुःखाची
इथे पारायणे,
नाजूक तुझी पदकमले
झेलतील कर माझे…५

तू का?,
शिश महाल मागते,
समजून घे ना सखे,
जगण्यास फक्त प्रेम लागते….६

*श्री पैठणकर सर*
*नाशिक*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना*

चार मनाच्या चार भिंती
कोपर्‍यात ओल भावनांचे
कितीदा वाहते नकळत अश्रू
आहे मज मोल आसवांचे

कधी जेवलो पोटभर
कधी राहिलो उपाशी
नाही केली चोरी चकाटी
प्रामाणिक राहिलो भुकेशी

गरीबी नेहमी खुणावते मला
म्हणते अरे समजून घे ना
बळकट आहेत तुझे मनगट
मग कशाचीच कमी ना

छप्परातून येणारा कवडसा
ती त्याकडे टक लावून पाहते
मी हळूच ठेवता हात खांद्यावर
बावरून डोळ्यांच्या कडा पुसून घेते

समजून घे ना हे वाक्य
जीवनाचा एक भाग झाला
देतो एकमेकांना हिम्मत
पण अश्रू साठतात तळाला

*डॉ. संजय भानुदास पाचभाई*
*नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना*

सहज तुला पाहते
तू एवढा गोड दिसतोस
सहवास तुझा हवा हवासा
गंध अप्रतिम उधळतोस…

स्वर्ग सुख म्हणतात ना ते हेच
गुंजन करत येतोस…
तुझ्या प्रेमाच्या सरीत
चिंब चिंब भिजवतोस…

कधी हळूच डोकावून जातोस
कधी वाट पहायला लावतोस
मन वेड्या…समजून घे ना…
रडक्या मनाला सांगतोस

तुझ्या या खोड्याने
उबदार होवून झोपते….
तुझ्या त्या थंडाव्याने
पुन्हा मी नव्याने खुलते…

रोज नवा नित्य दिसतोस
मी एवढा व्यस्त म्हणतोस
असा कसा रे तू खडूस….
अवचित वादळ घेवून येतोस

सखा…माझा पाऊस तू
वरदान तुला देवाचे…
समजून घे ना..अवचित
येवून खेळ करू नको मनाचे

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना*

आई तुझा संघर्ष पाहता
मज कळला नाही कधी
हातावरचे फोड बघून
हृदय कालवले कधी

कायम राबत राहीली
पाठीचा कणा मोडेस्तवर
पण नाही कधी झुकली
पर्यायी व्यवस्थेसमोर

विटा उचलताना जेव्हा
बोटे फुटायची तुझी
डोळ्यातल्या वेदना पाहून
आग पेटायची माझी

मागितले नाही कधीच
कुणालाही कापडलत्ता
तूझ्या वरच गाजवली
माझ्या बापाने सत्ता

पाठीवरचे वळ सकाळी
सांगायचे नवी कहानी
समजून घे ना आई
कशी राहू समाधानी

हूंकारणे रागाने कधी
आवडून घेतले नाही
कशी परतफेड करू ग
जीव तूझ्यात गुंतून राही

*सविता धमगाये*
नागपूर
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿👩🏻💕➿🌈🔆🌈➿💕👩🏻➿
*समजून घे ना!*

तूच माझा सखा
तूच माझा सोबती
समजून घे रे मला
छळशील असा किती

भाव माझ्या मनातील
जाणून घे कधीतरी
शब्दांनीच का यावे
धावून असे मध्यस्थापरी

कधी कधी शब्दांनाही
येत असेलच कंटाळा
अशावेळी तरी आठवावा
निस्वार्थ प्रेम जिव्हाळा

दिसेल कधी रे तुला
ओलावलेली पापणी
स्वार्थपलीकडचे प्रेम
अन रागामागची मृदुवणी

समजून घे ना कधी
न सांगता मनाच्या यातना
जीवापाड करते प्रेम
कळू दे तुज भावना

*सौ अनुराधा भुरे,नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles