“अविष्कार २०२२” चे थाटात उद्घाटन

“अविष्कार २०२२” चे थाटात उद्घाटन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या संशोधन स्पर्धा “अविष्कार २०२२-२३” या दोन दिवसीय कार्यक्रमाचे (१६-१७ डिसेंबर) उद्घाटन दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी बेसा, नागपूर येथे संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय डॉ. संजय दुधे, प्र. कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, माननीय डॉ. अखिलेश पेशवे, प्राचार्य, धरमपेठ कॉलेज ऑफ सायन्स, नागपूर, तसेच नागपूर विद्यापीठ अविष्कार समितीचे अध्यक्ष डॉ. भरत भानवसे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक श्री मंगेश पाठक, आजीवन शिक्षण विभागाचे संचालक डॉ. निशिकांत राउत, अंबे दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मनोज बालपांडे, दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्राचार्या डॉ. उज्वला महाजन, डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य डॉ. नितीन दुमोरे तसेच या अविष्कार कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. निलेश महाजन याच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने, दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

संपूर्ण विद्यापीठातील ३०० संशोधकांनी त्यांचे शोधकार्य पोस्टर व मॉडेल च्या स्वरुपात प्रदर्शित केले. समाजपयोगी व उत्पादकता असलेल्या संशोधनाची गरज प्रमुख पाहुण्यांनी वृद्धींगत केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कुमारी अपूर्वा तिवारी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. निलेश महाजन, डॉ. अजय पिसे, डॉ. पुरुषोत्तम गणगणे, डॉ. अमोल वरोकर, डॉ. मंगेश गोडबोले, डॉ. मोहम्मद कलीम, श्री किशोर दानव, श्री सचिन मोरे, श्री सचिन मेढी, सौ. विजयश्री रोकडे, सौ. मोनाली दुमोरे, सौ. रोहिणी खरवडे, कु. विजया राबडे, सौ, रुची शिवहरे, सौ. अश्विनी इंगोले, कु. अमृता शेटे, कु. श्वेता काळे, कु. रूषिका जयस्वाल, कु. गायत्री तिवस्कर व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा महत्वपूर्ण सहभाग लाभला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles