शिक्षकांच्या पगारासाठी बजेट कमी पडू देणार नाही; संचालक शरद गोसावी यांचे अश्वासन

शिक्षकांच्या पगारासाठी बजेट कमी पडू देणार नाही; संचालक शरद गोसावी यांचे अश्वासन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलबीत प्रश्नावर शिक्षण संचालक शरद गोसावी बरोबर शिक्षक संघाची चर्चा_

सोलापूर: राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पगारासाठी होणार्या विलबांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळानी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे भेट घेऊन चर्चा केली असता डिसेबंर पासून राज्यातील कोणत्या ही तालुक्याला बजेट कमी पडू देणार नाही असे स्पष्ट केले असल्याचे माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते शिवानंद भरले यांनी प्रसिध्दीस दिली आहे

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघांचे नेते माधवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष केशवराव जाधव माजी अध्यक्ष राजाराम वरूटे जेफ सल्लागार वसंतराव हारगूडे राजू वालगूडे आदीनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विवीध प्रलबीत प्रश्नावर आज शिक्षक संचालकाबरोबर चर्चा केली

शिक्षकाचे पगाराबाबत कमीप्रमाणात मिळणारे आर्थिक तरतूद, सेवानिवृत्त शिक्षकाचे देय असणारे रक्कमेची तरतूद, शिक्षकांचे अश्वासीत प्रगती योजना, कोवीड ड्यूटी करताना मयत झालेल्या वारसाना 50 लाखाचा विमा अनुदान वारंवार ऑनलाईन माहीती मागणी मूळे अध्यापनावर होणारा परिणाम, शालेय स्वच्छतागृहासाठी अनुदाना या विषयावर चर्चा झाली.

यावेळी शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शिक्षकांच्या वेतनासाठी पर्याप्त अधीकचा आर्थिक तरतूद शासनाकडे मागणी केली असून डिसेंबर पासून राज्यातील कोणतेही तालुका मागे ठेवली जाणार नाही कोविड विमा अनुदानासाठी राज्यातील प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेला पाठविली आहे ज्यांचे प्रस्ताव त्रूटी दूर करून आलेत ते प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी पाठविलो आहे शिक्षकाचे अश्वासीत प्रगती योजनेचे प्रस्ताव तयार केला असून शालेय शिक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने वित्त विभागाकडे पाठविली जाईल शालेय स्वच्छतागृह कोणत्या योजनेतून करायचे या बाबत शाळाना स्पष्ट परिपत्रक काढण्यात येईल असे या चर्चेत शिक्षण संचालकानी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles