हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकाधिकार परिषदेतर्फे “बांगड्या घाला मोर्चा” चे आयोजन

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकाधिकार परिषदेतर्फे “बांगड्या घाला मोर्चा” चे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधीच्या मोर्चाची माहिती देण्यासाठी नागपूर येथील टिळक पत्रकार भवन येथे लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्र परिषदेमध्ये किशोर गेडाम म्हणाले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक क्षण सुद्धा मंत्री पदावर राहू नये. ते पुढे म्हणाले महाराष्ट्राची पोलीस ही कर्तव्यदक्ष असून कसाब सारख्या आतंकवाद्याला पकडण्यासाठी आपल्या छातीवर गोळ्या घेताना घाबरले नाही.

राज्याकडे सीआयडी शाखा, एटीएस शाखा, एसआरपी ,सीआरपी व वेळ पडल्यास राज्य सरकार भारतीय थल सेनेची मदत घेऊन कसल्याही अपराद्यालाला पकडू शकते. मग देवेंद्र फडणवीस ला मैत्रेय उद्योग समूहाच्या चेअरमन वर्षा सतपाडकर का सापडत नाही? म्हणून मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी महिलांनी “बांगड्या घाला मोर्चा” आयोजित केला आहे.

राज्याच्या MPID कायद्या अंतर्गत मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधींना त्यांचे पैसे परत मिळूच शकत नाही. राज्य सरकारला जर का मैत्री उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधींना न्याय मिळवून द्यायचा असेल तर 2019 केंद्र सरकारने पार्लमेंट मध्ये( buds act 2019) अनियमित जमा राशी अधिनियम प्रतिबंधक कायदा -2019 पारित केला आहे. हा कायदा सगळ्या राज्यासाठी बंधनकारक आहे. या कायद्याने समय सीमा निर्धारित केली असून सक्षम अधिकारी ला सर्वस्व अधिकार दिले आहेत.

राज्याच्या सेशन व डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये मैत्रीच्या केसेस असून त्या न्यायालयात शासनाने अजिबात सरकारी वकिलाची नेमणूक केली नाही म्हणून सगळ्या ठिकाणी मैत्रीच्या केसेस पेंडिंग मध्ये पडलेल्या आहेत याला सर्वस्व जबाबदार राज्याचे गृहमंत्री व विधी व न्याय मंत्री आहेत असा आरोपही लोकनेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी केला. मैत्रेय समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांच्या परताव्याची केस स्वतंत्र असावी. शासनाने वकील सुद्धा स्वतंत्र द्यावा मैत्रेयच्या केस मध्ये असलेला सरकारी वकील इतर कोणत्याही केस मध्ये सरकारी वकील नसावा, मैत्री प्रकरण 6 वर्षापासून रेंगाळलेला आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, व हे सगळं काहीही न करता शासनाने मैत्रीची संपत्ती जप्त केली आहे म्हणून शासनानेच गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे पैसे परत करावे इत्यादी मागण्याला घेऊन 19 डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकाधिकार परिषदेतर्फे “बांगड्या घाला मोर्चा” चे आयोजन करण्यात आलं आहे.

मोर्चाच्या नेतृत्व किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब करणार आहेत. लोकाधिकार परिषदेच्या हा मोर्चा यशवंत स्टेडियम पासून निघेल. मोर्चाला यशस्वी करण्यासाठी कर्नाटक, गुजरात ,आंध्र प्रदेश मुंबई नाशिक पुणे जळगाव बुलढाणा यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर इत्यादी ठिकाणाहून गुंतवणूकदार व प्रतिनिधी मोर्चाला हजर राहणार आहेत. अशी माहिती लोकाधिकार परिषदेच्या सचिव मायाताई उके यांनी प्रसिद्धी पत्रकार दिली. पत्र परिषदेला राजेश पाटील, सौ नंदाताई पंदीलवार, सौ. शालिनीताई पाटील, सौ. टेंभुर्ण मॅडम,सौ. सूर्यकांताताई घरडे, मौननाथ मेश्राम, ज्ञानेश्वर उके, सौ. मायाताई पेंदोर उपस्थित होत्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles