अंतराळाचा ‘सत्यशोध’ म्हणजे मानवी कौशल्याचा अत्युच्च ‘विज्ञान आविष्कार; प्रा. तारका रूखमोडे

अंतराळाचा ‘सत्यशोध’ म्हणजे मानवी कौशल्याचा अत्युच्च ‘विज्ञान आविष्कार; प्रा. तारका रूखमोडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शुक्रवारीय हायकू काव्यपरीक्षण_

आकाशगंगा
दावे गूढ नजारा
दिव्य जाणिवा

रात्रीचा कीर्र काळोख..! त्या तिमिरात नभाला निरखून पाहिल्यावर मनाला भुरळ घालणाऱ्या, लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांचा दिसतो जल्लोष. कधी स्वच्छ निरभ्र आकाश; तर कुठे कृष्णमेघांनी दाटलेला आगाज. कुठे आसमंताची गहन निळाई, तर कुठे मनमोहक रंगवैभवाची जर्दायी. नजरेत न मावणारं, कल्पनाशक्तीच्या पलीकडलं हे अफाट दिव्यत्व असिमित अनंत. शब्दांच्या मापात न बसणारं, चक्षूंच्या पापणीत न सामावणारं, ज्ञानकक्षेच्याही पलीकडलं ते असंख्य आकाशगंगेचं ब्रह्मांड..!

तसं ग्रह, नक्षत्र, तारका यांच्याशी आपलं नातं जुनंच, तरीही नित्य नूतन भासणारं. या ब्रह्मांडात लाखो रहस्य गुढत्व आपल्याला खुणावत राहतात. सूक्ष्म निरीक्षणाअंती या अनंत व्यापक पोकळीत, जी दुधाळ रेषा दिसते त्यात लाखो तारकांचे म्हणजेच आध्यात्मिक भाषेत हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृगनौका, वृश्चिक, धनू, गरुड या तारका समूहातच ही आकाशगंगा पसरलेली.तिची निर्मितीही किती विस्मयकारी!!! आधी ताऱ्यांची निर्मिती,मग गुरुत्वाकर्षण शक्तीने सौरमंडलाची निर्मिती व करोडो सौरमंडलातून एक ‘आकाशगंगा’, अशा कित्येक आकाशगंगा मिळून ‘ब्रम्हांडाची’ निर्मिती. कित्येक अब्ज वर्षापासून प्रत्येक ग्रह पिंड तारे प्रकाशाला एका चुंबकाप्रमाणे आत खेचणारा मध्यभागी स्थित ‘कृष्णविवर’.. ही अंतराळाची अद्भुत रचना. हा ‘सत्यशोध’ म्हणजे मानवी कौशल्याचा अत्युच्च ‘विज्ञान आविष्कार होय.

पण कालच एक संभाषण माझ्या कानावरून गेलं..’माझ्या राशीला तर ग्रहच लागलेत. मला नोकरीच मिळेना’.. हे विषारी शब्दशल्य बोचलं मनाला.कारण राशीतले ग्रह हे आपल्यावर उलटतात ही संकल्पनाच तकलादू, लाखो मैल दूर असणारे हे ग्रह विश्वाच्या या अथांग पसाऱ्यातील एका नगण्य जीवावर कशे काय परिणाम करणार? ‘माणसाच्या मनीचे हे खेळ’,कारणाशिवाय त्रास देणे हे माणसाच कर्म. या गूढाच्या किती अंधश्रद्धा निर्माण झालेल्या, पण बऱ्याच बाळबोध प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिकांनी शोधली व रहस्यांचा शोध घेतला, मानवी मनाचे कोडं विज्ञानामुळे सुटले.

चला तर आपणही आपल्या मनाचे कवाडं उघडून आकाशगंगेसारखी व्यापक बनवूया. वैज्ञानिकतेवर भर देऊन, त्याकडे साहसी व समीक्षात्मक दृष्टीने बघून, नवसंशोधन व सत्य स्वीकारून, वस्तुस्थितीवर भर देत जितका पुरावा हाती लागेल त्या तथ्यावर विश्वास ठेवून ब्रम्हांड बघूया. हेच तर मर्म सांगण्यासाठी आ.राहुल सरांनी हे चित्र दिलेलं. अनंत ब्रह्मांडाप्रमाणे आ.सरांची कल्पकताही किती अगाध!! त्यांच्या कल्पकतेचे मनोरथ एवढे उत्तुंग व विराट आहेत की, माझ्या शिलेदारांनीही त्या ब्रह्मांडाच्या पोकळीत शब्दशलाकेने प्रवास करावा व त्यात वैज्ञानिक दृष्टीसामर्थ्याचे रंग भरावेत व काव्यगंगा प्रवाहित करावी म्हणून हे कदाचित चित्र दिलेलं. सर्वांनी छान लेखन केलंय. लेखणीस अभिनंदनीय शुभेच्छा ..लिहिते व्हा..!

आ.राहुल सरांनी मला हायकू काव्य लेखणाची संधी दिली त्याबद्दल हृदयस्त ऋणानुभार.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles