शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील विजेत्या कवींच्या रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट तेरा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : त्या भूलथापा☄*
*🍂शनिवार : १७ / डिसेंबर/२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*त्या भूलथापा*

चेहऱ्यावरी मुखवटा
पांघरुन सभ्यपणाचा
दारात ऊभे ते घेऊन
कागद आश्वासनांचा

करुन बतावण्या त्या
न केलेल्या कामांच्या
म्हणती पुन्हा द्या संधी
भूलथापा दांभिकांच्या

दिलेला शब्द सांगा तुम्ही
एकदा ही पाळलात का?
आपल्या खुर्चीशी कधी
प्रामाणिक राहीलात का?

करुन दिशाभूल माझी
टाकलेत डाव कित्येक
उधळून लावेन आता
खेळ तुमचा मी प्रत्येक

समजलात जरी मला
मी जनता साधीभोळी
परि त्या भूलथापांना हो
आता पडणार नाही बळी

बंद करा तुम्हीच आता
निव्वळ ही पोपटपंची
कामे केल्याविना नाही
मिळणार कधीच खुर्ची

*सौ.अर्चना सरोदे*
*सिलवास,दादरा नगर हवेली आणि दमण व दिव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

चांदोबा आला वसुंधरेवर
लहान मुलांशी खेळायला
परीराणी गेली चंद्रावर
चांदण्याबरोबर जादू करायला….

गगनात विहार करतो श्वान मोती
सूर्य आलाय अथांग सागराशी
चमचमर्‍या तारकांचा सडा पडला
आंब्याच्या आणि फुलझाडांपाशी …

सप्तर्षी उतरले शिडीने भूमातीवर
ॠषी साधना करी तप्त सूर्यावर
राजा ,राणीची सवारी चक्क गाढवावर
माणूस दिसतोय बसलेला वाघावर…

त्या भूलथापा सर्व आहेत मजेच्या
म्हणू नका कोणी वसू थापाडी कशी?
गंमत करते जरा आपल्या सर्वांची
अग अग म्हशी मला कुठे तू नेशी….

*वसुधा नाईक,पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

गावच्या निवडणुकीची
पुढार्‍यांना लागली चाहूल
ग्रामपंचायत निवडणुकीचा
वाजू लागला बिगूल

गावाची ग्रामपंचायत
म्हणजे मिनी मंत्रालय
सर्वांची वाढली उत्सुकता
करू लागले सारे अभिनय

पैसेवाले उतरतात रिंगणात
आपला जाहीरनामा धरून
आपल्या कामाचा लेखाजोखा
हमीपत्रात देतात भरून

नुसत्या ‘ त्या ‘ भुलथापा
देत असतात लोकांना
पाच वर्षां मध्ये नेते
भरतात आपला खजिना

हमी देतात हमखास
नाही गावाचा विकास
पैसा खर्च करतात जरूर
पण गावात नसतो प्रकाश

राजकारणी लोक असतात असेच
नाही विकास कामांची सुविधा
नागरिकांना होतो त्रास
त्यांच्यासमोर असते दुविधा

अशा ‘ त्या ‘ भुलथापा मारणार्यांना
शिकवावे आपल्या मतांचा धडा
येणार्‍या पंचवार्षिक निवडणुकीत
करावे त्यांचा योग्य न्यायनिवाडा

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*’त्या’ भूलथापा*

जगण्यात अर्थ होता तू भेटल्यावर
मनवन्यात तर्क होता तू रुसल्यावर

जेव्हा तू त्या पाउलवाटेने गेली
गंधाळली ती वाट तू परतून गेल्यावर

मी रमून जातो स्वप्नातील जगात
तू नसतेस तिथे मज जाग आल्यावर

जाळून टाकले मी स्वप्नातील जगाला
सुखाने झोप येते पापण्या मिटल्यावर

असा कसा तू पाठीवर वार केला
तुटून गेलो होत्या त्या भूलथापा कळल्यावर

*डॉ. संजय भानुदास पाचभाई, नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*”त्या” भूलथापा*

केलंय सहन मी
या तुझ्या भूलथापा
किती देतंय मज ?
भेटीच्या आणाभाका..!

मन वेडेच माझे
व्याकूळ होतंय असे
भेटायला तुझी जशी
सखे बेचैनीही वाढतसे

किती सहज झालेत
हे मनोमिलन आपुलेय
स्वप्नातील त्या भेटीत
माझे मन तू जिंकलेय..!

भेट आपली ती
जणू किमयाच होती
घायाळ मी नजरेत
अन् जवळीक तुझी होती

मन मनात गुंतलेय
स्थिरावलो ह्रदयात तुझ्या
काळीज दिलेत काढून
जणू ओंजळीत या माझ्या

नको देवूस प्रिये
तुझ्या त्या भूलथापा
तुजविण अधूरे जीवन
लागली तुझीच आस आता

*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

घेऊ नको रे साखरचुंबन
चाखून होईल रे मधुमेह
झुकताच हसरी पापणी
संवेदना जागल्या रे मनी
गाठलास रे सागरकिनारा
अफलातून केलीस धमाल
अथांग तुझ्या रे मनाचा….
लागला नाही रे थांगपत्ता
डुबत गेले मीही तुझ्यात
परंतु सांगशील का खरं ?
आताच का लागलास टाळू ?
तू जवळ असूनही माझ्या
तडफडतोय रे जीव एकाकी
निश्चल मीच पर्वतासारखी
शहारते…बहरते…हरवते…
ऊन…वारा…पाऊस झेलत
कसं म्हणू तुला फुसका बार ?
येशील का रे घेऊन गजरा
विसरून जाईन दुःख सारं
नव्हत्या ना ‘त्या’ भूलथापा
विश्वास ठेवून जगते तुझ्यावर
फक्त या एकाच आशेने…
भेटशील रे त्या वळणावर ?
जाण्यापुर्वी रे मी सरणावर…

जाण्यापुर्वी रे मी सरणावर…

✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

द्यायचेच होते सोडून
घेवून कशाला गेला
दगाबाज मोठाले वादे
देवून कशाला गेला ..

गोड बोलून मनाला
रिझवीत कशाला गेला
चुरडायचीच स्वप्ने होती
सजवीत कशाला गेला..

भ्रमात तुझ्या प्रेमाच्या
गाफिल राहिले मी
भूलथापाच तुझ्या त्या
वचनात पाहिल्या मी..

जन्मदात्यांना विसरले
यौवनी भुलले मी
जातपातीच्या पल्याड
प्रेमात झुलले मी..

गुलाबी खोटीच स्वप्ने
दावीत कशाला गेला
जाळ्यात अडकले मी
ओढीत कशाला गेला..

धर्मांतरास तगादा आता
डाव कुटील कशाला केला
भोगून संपले आता
नित्य भोग नशीबी आला..

*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

बंद करा रे आता त्या भूलथापा
बळी पडणार नाही आम्ही आता
गोड गोड बोलून भुलवत आलात
आमिषा बळी पडणार ना आता

खूप केली तुम्ही लूटमार आमची
पर्वा न तुम्हा सत्ताधाऱ्या जनाची
आश्वासनाची खैरात करता मोठी
बळी पडतोय आम्हीचं होते गोची

षढयंत्र तव् आता जाणले आम्ही
समजले तुमच्या मनीचे ते विचार
आम्ही निर्णय घेऊन आता मात्र
उचित उमेदवाराचे बटन दाबणार

जनता आता राहिली नाही भोळी
सुज्ञ झालेत मतदार लोक जागा
भोळी भाबडी जनता नका समजू
त्यांचेही विचार मनी स्मरून वागा

भोळीभाबडी जनता इथं आजवर
बळी पडत आली तव् भूलथापांना
कुठंवर चालणार तुमचीचं मुजोरी
किती दिस ऐकणार व्यर्थ गप्पांना

बस्स कराव्या आता लोकशाहीत
मोठाल्या गप्पा अन् त्या भूलथापा
आम्ही हे करतो,आम्ही ते करतो
गुलदस्त्यामध्ये गुंडाळून ठेवा गप्पा

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿
*”त्या”भूलथापा*

“त्या”भूलथापा तुझ्या
अन् बनावट बडेजाव
ओळखून मी होते रे
तुझे सारे कपटी डाव

जाळे तुझे प्रेमाचे रे
कळला गळ्याचा फास
मनोमनी जाणिले मी
दाखवतो खोटी आस

नव्या युगाची मी बाला
परिपक्व मी विचारानी
भूलणार ना कधीही रे
तुझ्या त्या भूलथापानी

बलशाली माझे मन
सामर्थ्य आहे अंतरात
चांगले वाईट जाणूनी
मार्ग क्रमिते जीवनात

नको करू उध्वस्त
कधी कुणा जीवनाला
भूलथापाने न मिळे
खरी शांती मनाला

*श्रीमती सुलोचना मुरलीधर लडवे*
साईनगर,अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*”त्या” भूलथापा*

“त्या” भूलथापा ,
ते बोलणे गोड-गोड….,
अशा थापाड्यांना भुलणे,
मानवा तू सोड-सोड….!

तुझे बॅंक खाते,
तूच शिक सांभाळायला..,
नाहीतर बॅंक बॅलेन्सचा सूर्य,
लागेल हळूहळू ढळायला….!

फसवणूक करणाऱ्यांचीही,
होतच असते फसवणूक….,
“पेरले तेच उगवते,” सिद्धांत,
त्यांना दाखवतोच,आपली चुणूक..!!!

त्यांना दाखवतोच,आपली चुणूक..!!!

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

घेतले शपत तू किती दा
होत्या त्या तुझ्या भूलथापा
नुसता शब्दाने जवळ करून
मनात होता खोट्या प्रीतीचा थापा…

सोबतीला आधार देऊन
खाली आपटले तू दंनकन
पायाखालची जमीन सरकुन
हृदयात वादळ आल कोसळून…

लार्जी वाणी दशा माझी
का देती इतकं कोणाला महत्व
या परक्याच्या दुनियेत
कोणी कुणाचं नाही हे सत्य

शब्दात खेळवून तू सदा
भावनेचा केला कोंडमारा
त्या भूलथापा तुझा आठवून
जीवाचा होतो नुसता मारा..

शब्दाचा नायक असलेली तुम्ही
माझी कुठे तुलना तुमच्याशी
मी तर शून्य माझं लिहिण्याच
अस्तित्वच नाही माझ्याशी.!!

*सौ.ज्योती पाटील खोब्रागडे*
*रा.लोणावळा जि.पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा…..*

नाव तुझे रे होते बदनाम
त्या भूलथापा देण्याने
समोर म्हणती तुला चांगला
मागे खराब म्हणती रेट्याने //

भूलथापा देता देता
तुझे पोट भरेल आनंदाने
कधी होईल फजिती तर
मान खाली जाईल अपमानाने //

सुरुवातीला येते यश
भूलथापा लोकांना देण्याने
कळता गुपित हळूच त्यातले
लोक तुजशी वागती दुराव्याने //

आजवरी भूलथापांनी
चांगले झाले नाही कुणाचे
जाण खऱ्याचे महत्त्व तू
समर्थन करु नको खोट्याचे //

देऊ नको त्या भूलथापा
वाग जरा तू सत्याने
चांगले वर्तन करुनी जगी
जाणला जा तू कर्माने //

*फुलवरे चंद्रकांत खेमाजी*
*जि.हिंगोली*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या’ भूलथापा*

नव महिने गर्भात पोरा
तुला आईने वाढविले
त्रास वेदना सहन करुन
जन्माला तुला घातले

हात पकडून चालायला
पोरा तुला शिकविले
हातानी घास तोंडात
मायेने तुज भरविले

रात्र सारी जागुन बाळा
अंगाई गीत गाऊन तुला
कुशीत झोपविले रे लेकरा
माझ्या काळजाच्या तुकड्याला

मोठा झाला खूप शिकला
मोठा साहेब बनला
आईला वचन दिलेत
सुखात ठेवीन तुला

आई तुझे उपकार मी
कधीच नाही विसरणार
तुला कसलाच त्रास देणार नाही
आनंदात सदैव ठेवणार

नुसत्या त्या भूलथापा होत्या
आईला एकटी टाकून
वार्‍यावरती सोडून तो
परदेशी गेला निघुन

म्हातारी आई केविलवाणी
पोरग आज येईल उद्या येईल
दिव्यासारखी त्याची वाट बघते
आस धरुन बसली नक्की येईल

मित्राच्या फोनवर सांगतो
आई तुला परदेशी घेऊन जाईल
तिथे तुला कसलीच कमी नाही
पाळण्यात तुला झुलविल

नुसता फेकत त्या भुलथापा
जन्म देणाऱ्या आईची किंमत
कवडीची राहिलीत नाही
एक दिवस त्याच्यावर वेळ येईलत

*सौ पुष्पा डोनीवार चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles