ग्रामपंचायत निवडणूकच्या तोंडावर वायगाव (गोंड) पारधी बेड्यावर वॉश आऊट मोहीम

ग्रामपंचायत निवडणूकच्या तोंडावर वायगाव (गोंड) पारधी बेड्यावर वॉश आऊट मोहीम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सव्वा लाखाचा मोहा सडवा नष्ट, समुद्रपूर पोलिसांची कारवाई_

वर्धा: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर समुद्रपूर परिसरातील मौजा वायगाव गोंड पारधी बेड़ा येथे वॉश आउट मोहीम राबवित मोह दारू सडवा नष्ट करण्यात आला. यावेळी एक लाख सत्तावीस हजार रूपयांचा मोठ्या प्रमाणात मोहा सड़वा रसायन व मोहा दारूचा माल मिळून आला.

हा सर्व माल समुद्र्पूर पोलिसांनी जागीच नष्ट केला. आज समुद्रपूर व हिंगणघाट येथील अनेक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. पोलिसांनी मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी दक्षता घेतली आहे.

समुद्रपुर खंडाळा ग्रामपंचायत येथील ३ ही बुथवर मतदान प्रक्रीया सुरु असून ११.०० वाजेपर्यंत ३०% टक्के मतदान झाले असल्याचे केंद्राध्यक्ष अरविंद महाकाळकर यांनी सांगितले. मतदारांचा ओघ सुरु असून दुपारपर्यंत ५०% मतदान होऊ शकते अशी माहिती दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles