‘कधी स्वयंभू होणार मी..बहरायचं मला.!’; सविता पाटील ठाकरे

‘कधी स्वयंभू होणार मी..बहरायचं मला.!’; सविता पाटील ठाकरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण_

घरात अठरा विश्व दारिद्र्य..!खायचे वांदे आणि आजूबाजूची भयानक सामाजिक परिस्थिती, अंधश्रद्धा, दारिद्र्य, अनिष्ट रूढी परंपरा, यात जोखडलेला तिचा समाज. त्यात ती नुकतीच दहावी पास झाली. शिकायचंच पुढे हे मनात ठरवून घराबाहेर पडत होती. बसच्या भाड्यालाही पैसे नव्हते तिच्याजवळ, अशातच तिला “तो”भेटला…! अल्लड वय, नासमंजस भाव, घरातून मिळणाऱ्या प्रेमाचा अभाव,अलगद ओढली गेली त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात….! अल्लड वयातले ते प्रेम असच बहरत गेले, वाढत गेलं, मर्यादेच्या पलीकडे गेले…! अशातच तिला दिवस गेले. समाज काय म्हणेल?आपलं पुढे काय होईल ? या भीतीचा सामना करण्याचं ना धैर्य होत ना, धाडस…शेवटी अविचाराने टोकाचे पाऊल उचललं, अर्थात त्यालाही घेतलं सोबत..! एकाच झाडावर एकाच दोराला टांगून आत्महत्या केली.

तिच्या आणि उदरातल्या त्या बाळाची, “जगू दे ना मला” ही आर्त किंकाळी समाजाच्या आपल्यासारख्या तथाकथित पुढारलेल्या, विकसित म्हटल्या गेलेल्या लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. ‘बहरणार मी’ म्हणणारी ती उमलण्यापूर्वीच मावळली, खुडल्या गेली. स्वतः तर मावळलीच सोबत पोटातला अंकुर ही न बहरताच सुकला.. कोण? कोण?जबाबदार याला??? काय म्हणावे याला????जीवना प्रतीची अनास्था म्हणून की सामाजिक बंधनांचा विळखा….!

समाजाचं, कुटुंबाच दुर्लक्ष म्हणू की भ्याडपणा. नासमंजसपणा म्हणू की संकटापासून दूर पळून जाण्याचं बाळकडू. निराशेची गर्त म्हणू की माझ्यासह आपल्या सर्वांचं अपयश…! आज कित्येक अशा ‘बहरणार मी’ म्हणणाऱ्या कोवळ्या कळ्या खुडल्या जातात गर्भातच…! कित्येकांवर अत्याचार केला जातो. कित्येकांना जाळलं जातं, कित्येकांचा बळी घेतला जातो. कित्येकांना रोजच जिवंतपणे मरण यातना दिल्या जातात, कित्येकांना चटके दिले जातात तर कधी शब्दांनी तर कधी खुरपनीने. कधी ?कधी ??स्वयंभू होणार आहे ही स्री..कित्येक हुंड्याच्या आगीत जळतात तर कित्येक स्वार्थाच्या यज्ञात. थांबेल की नाही हे सर्व..अन् थांबेल तर कधी….? अनुत्तरीत प्रश्न अजुनही.

आपण मानवाचे हे असेच. तो निसर्ग पहा. निसर्ग अक्षरशः बहरलाय. आता तब्बल आठ वर्षांनतर फोंडा घाटावरील निरांकाल टेकड्यांवर कारवी फुलली आहे. रानभाज्यांप्रमाणे रानफुलांची मजाही न्यारीच असते. फोंडा येथील निकाल डोंगरावर जांभळ्या रंगाच्या कारवीचे ताटवे फुलले आहेत. ही फुले आठ वर्षांनी एकदाच फुलतात. त्यामुळे सगळ्या निरांकाल टेकड्या निळ्याशार झाल्या आहेत. कारवी पूर्ण बहरल्यानंतर या फुलांच्या छटा बदलण्यास सुरुवात होते. संपूर्ण पश्चिम घाटात लक्ष वेधून घेणारे हे झुडूप. कारवी आयुष्यात एकदाच फुलते. फुलांच्या नंतर वनस्पती फळांनी भरलेली असते. ही फळे सुकायला पूर्ण एक वर्षं लागते. पुढच्या पावसात ही फळे जमिनीवर पडतात आणि त्याचे बियाणे होते. या बियाण्यातून नवे बहरणारे झुडूप तयार होते. घामाच्या धारांनी शेती बहरते. मेहनतीने मातीला गंध चढतो. खरंच आपण बहरुयात ना….निराशेचे मळभ दूर सारून संकटांवर मात करून. अर्थात, ‘बहरणार मी’ हा आगळा वेगळा विषय आजच्या बुधवारी काव्यरत्न स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी देवून अंतर्मुख व्हायला भाग पाडले आहे.

‘थोपवून दुःख लाटांना आता बहरणार मी,
संकटातून वाट काढून ध्येय ते गाठणार मी..’

आज गरज आहे अशा मानसिकतेची…तेव्हा सर्वांना मनापासून आभार. अन् पुढील काव्यप्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा….!!

सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली
मुख्य परीक्षक/ प्रशासक/ सहसंपादक/ कवयित्री

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles