‘हायकू काव्य परीक्षक प्रा.तारकाताई रूखमोडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’; चंदू डोंगरवार

‘हायकू काव्य परीक्षक प्रा.तारकाताई रूखमोडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’; चंदू डोंगरवार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दिनांक 21/12/2022 ला ‘मराठीचे शिलेदार’ समुहातील एक भारदस्त व्यक्तीमत्त्व, हायकू काव्य परीक्षक, सहप्रशासक, संकलक आणि मार्गदर्शक, तसेच अर्जुनी/मोर जिल्हा गोंदिया येथील रहिवासी असलेल्या प्राध्यपिका णआ. तारकाताई रुखमोडे यांचा वाढदिवस म्हणजे जन्म दिवस होता..! समुहातील त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणा-या त्यांच्या मैत्रिणींनी आणि काही भगिनींनी त्यांना त्यांच्या सुदृढ आरोग्य व पुढील प्रगतीसाठी खूप सुंदर अशा भावनायुक्त शब्दांत शुभेच्छा दिल्यात..! समुहात काही अविस्मरणीय आठवणी ताज्या करत त्यांच्या सोबतचे फोटोसुध्दा शेअर केलेत..!

मलाही वाटलं आपणही त्यांच्या या शुभ प्रसंगी काही तरी वेगळ्या पद्धतीने तोडक्या मोडक्या का असेना..? पण मनापासून शुभेच्छा द्यावेत..! म्हणून मी एक कविता लिहिली. आणि कवितेतून जन्म दिवसाच्या शुभेच्छा दिल्या..! त्यांच्या विषयी मला खूप काही वैयक्तिक माहिती नसली, तरीसुद्धा समुहातील त्यांनी लिहिलेले सर्वच परिक्षणीय लेख मी नेहमी वाचत असल्याने त्यांच्या प्रखर, तेजोमय आणि आदर्श व्यक्तीमत्वाला उजाळा देण्याचा यातून लहानसा प्रयत्न केला आहे. तसे पाहता सूर्याला पणतीने उजेड किंवा प्रकाश दाखवले जात नाही..! हे आपणा सर्वांना माहिती आहे.

मी खूप मोठा लेखक किंवा कवीसुध्दा नाही. मला लागलेल्या छंदामुळे मी ‘मराठीचे शिलेदार’ समुहात वेळ प्रसंगी लिहून आपले मानसिक व बौध्दिक विकास करण्यासाठी व संतुलन कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असतो. हे केवळ मला या समुहात काम करण्याची संधी मिळाल्याने मी हे लिहू शकतोय. व ती संधी मला उपलब्ध करून दिली. ते.. आमचे मितभाषी आणि सुशोभित व्यक्तीमत्व असलेले मित्र आ. हंसराज खोब्रागडे सर आणि आ. सुधाताई मेश्राम यांच्या सहकार्यामुळेच. तसेच मला संधीचे सोने करण्यासाठी या समुहातील सर्वच परीक्षक मंडळी आणि आदर्श वाचक असलेले मराठीचे शिलेदार माझ्या रचनेला व लिखाणाला वाचन करून प्रतिसाद व प्रतिक्रियाद्वारे माझा आनंद नेहमीच द्विगुणित करतात याचा मला मनस्वी आनंद आहे.

मला लिखाण करण्यासाठी जी उर्जा मिळते ते केवळ आपल्या आशिर्वादाने आणि प्रेमामुळे आणि हो.. सर्व काही बरोबर आहे; पण आपण म्हणाल ..सर काही तरी विसरल्यासारखं वाटतंय.. होय ना एक नाव… ज्यांना मी किंवा समुहातील इतर कोणी कधीही विसरणार नाहीत..आणि त्यांच्या शिवाय आपली ओळख निर्माण होवूच शकत नाही किंवा झालीच तरीही ती अपूर्णच असेल. असे..ते अहोरात्र प्रयत्नशील राहून वेगवेगळ्या विषयांवर लिखाणाला संधी उपलब्ध करून देतात आणि आमच्या डोक्याला विचारांची चालना देण्यासाठी खूप मेहनत घेतात. अशी “श्रृजनशील व्यक्ती” म्हणजे समुहातील मुख्य प्रशासक /संपादक मा. राहुल पाटील सर…! यांचे आणि सर्व सहप्रशासकांचे मनापासून आभार..!! धन्यवाद..!!! प्रा. तारकाताई रुखमोडे यांना याद्वारे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी जन्म दिवसाच्या निमित्याने पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा…!

मी लिहलेली काव्यरचना…!

जन्मदिन विशेष

जणू तारका नभातील
मनमोहक स्वभाव आहे
लुकलुकणा-या जगातील
एक लाखात दिसत आहे

जन्मास आली जेव्हा
तो काळोख दूर झाला
ज्याची प्रतिक्षा होती..!
तो दिनकर घरात आला

कस्तुरीचा सुगंध का
दिसत नसतंय कुणाला
कसं घ्यावं शोध त्याचा
तो मृगच पळतो आहे

आशीर्वाद हा थोरांचा
कवच कुंडलेच आहे
तुझा तेजोमय प्रकाश
रविकिरणा समान आहे

तुज द्यावे तरी काय
हा प्रश्न मनात आला
उत्तर शोधत असता
आज दिवस मावळला

दिवसाची रात्र झालीय
मिळाल्या ना शुभेच्छा
तव स्वप्ने साकार होवोत
हिच मनोभावे सदिच्छा !

✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर, जि.गोंदिया
सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles