
शिवसंग्रामचे संस्थापक स्व. विनायकराव मेटे यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करणार; शिवाजीराव शिंदे
नागपूर: शिवसंग्रामचे संस्थापक स्व. विनायकराव मेटे यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश तर्फे स्थापनेच्या विसाव्या वर्धापनादिना निमित्त ६ जानेवारी रोजी, भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी प्रमुख पदाधिकारी प्रचार व संघटनात्मक बांधणी राज्यभर करीत आहे. मराठा लढा उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि 65 वर्षावरील शेतकऱ्यांना पाच 5 हजार रुपये पेन्शन मिळावी. यासाठी आम्ही सरकारशी संघर्ष करणार आहोत.
2014 पासून आम्ही भाजपाचे घटक पक्ष म्हणून कार्यकरीत आहोत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप सोबत लढणार शिवसंग्राम प्रणित स्थापन झालेल्या भारतीय संग्राम परिषदेच्या माध्यमातून पुढची आमची वाटचाल राहणार असल्याचे शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना सांगितले. पत्रपरिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीराव शिंदे नागपूर, जिल्हा अध्यक्ष दीपक मते आणि प्रशांत वलीवकर यांची उपस्थिती होती.