‘प्रभू येशू… तारणहार परदेशी देवदूत…!’; वैशाली अंड्रस्कर

‘प्रभू येशू… तारणहार परदेशी देवदूत…!’; वैशाली अंड्रस्करपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मानवी समुदाय आदिम जीवनापासून प्रगत होत गेला. गुहेत राहणाऱ्या आदिमानवाने टोळीचे महत्त्व जाणले. शिकार करणे, कंदमुळे खाणे अशा टप्प्या टप्प्यातून तो शेतीकडे वळला. एका जागी स्थिर होऊ लागला. आपला समुदाय, आपली टोळी यांचे रक्षण करणाऱ्या एखाद्या बलाढ्य, चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची नेता, पुढारी म्हणून ओळख ठरू लागली. हळुहळू वर्चस्ववादी राजा आणि त्याच्या हुकूमांचे पालन करणारी प्रजा अशी समाज विभागणी होऊ लागली. या विभागणीने नंतर एवढे अक्राळविक्राळ रूप घेतले की, मानवजात म्हणण्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहावे.

अशा या अटीतटीच्या क्षणी प्रत्येक काळी, प्रत्येक स्थळी, तारणहार रूपात येणाऱ्या व्यक्ती पूजनीय ठरल्या. धर्म, प्रांत, जातपात अशा विविध पातळींवर समाजाला योग्य दिशा देणारा, जगात प्रेम, दया, शांती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणारा तो कुणी देव ठरला, कुणी अल्ला तर कुणी मसिहा ठरला. या सर्वांचेच कार्य दुष्टांवर सुष्टांचा विजय… यांपैकीच एक म्हणजे येशू मसिहा. येशू मसिह स्वतःला देव नाही तर देवाचा पुत्र मानतात… शुभसंदेश देणारा देवदूत मानतात.

जेरूसेलमजवळील बेथलेहेम या गावी येशूने माता मरियेच्या पोटी जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतला अशी ख्रिस्ती बांधवांची श्रद्धा आहे. त्यांच्या जन्मापासूनच गणना केलेली ग्रेगरीयन दिनदर्शिका आपण वापरतो. अशा या प्रभू येशूचे भारतात परदेशी देवदूत म्हणून स्वागत करण्याचे आणि नाताळ सण साजरा करण्याचे प्रयोजन काय आहे ते थोडक्यात बघू या. प्रभू येशूच्या बारा शिष्यांपैकी एक शिष्य म्हणजे संत थॉमस. प्रभू येशूंनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी बाराही जणांना जगभर पाठवले, तेव्हा संत थॉमस इ. स. ५२ साली भारताच्या मलबार किनाऱ्यावर उतरले. केरळ प्रांतात ७ चर्चेस स्थापन करून त्यांनी लोकांना ख्रिस्ती धर्माचे ज्ञान दिले आणि तिथूनच प्रभू येशूच्या कार्याची महती आणि ख्रिस्ती धर्माची ओढ लोकांमध्ये निर्माण झाली. तीच ओढ आपल्याला आजही ख्रिस्ती बांधवांमध्ये दिसून येते.

२०२२ या वर्षातील नाताळाच्या सणाची सगळीकडे जय्यत तयारी सुरू असतानांच माननीय राहुलदादांनी शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेकरीता ‘परदेशी देवदूत’ हा विषय दिला आणि मन नकळत प्रभू येशूच्या जन्माविषयीच्या आनंदोत्सवाकडे वळले. भारतीय समाजात जितके श्रेष्ठ स्थान भगवान श्रीकृष्ण, तथागत गौतम, भगवान महावीर, गुरूनानक यांचे तितकेच अढळ स्थान प्रभू येशूचे…या येशू मसिहच्या जन्माचा उत्सव म्हणजे ख्रिसमस.. नाताळ…प्रभूच्या स्तुतीपर गाणी, आकर्षक क्रीप, नवनवीन कपडे आणि गोडधोड खाऊ… या सर्वांनी उधाणलेला हा सण म्हणजे लहानथोरांसाठी पर्वणीच. त्यातल्या त्यात २५ डिसेंबर च्या रात्री सांताक्लॉज नावाचा म्हातारा बाबा आपल्या पोतडीतून छोट्या मुलामुलींसाठी खेळणी, खाऊ आणून देतो ही गोड समजूतही मनाला खूप आनंद देते. असा हा ‘परदेशी देवदूत’ शब्दांतून साकारण्याची संधी माननीय राहुलदादांनी शिलेदारांना दिली. बरेच शिलेदार जरा गोंधळले. तारणहार देवदूतच्या ऐवजी संहार करणारा कोरोनारूपी दैत्य रचनांमधून साकारला…पण देव आणि दैत्य या समाजमनातील पूर्णतः वेगवेगळ्या संकल्पना… त्यामुळे रचनांची नाळ आशयाशी जुळली नाही. काहींनी संकटकाळी मदत करणाऱ्यांत परदेशी देवदूत शोधला…तर दिनकर दादा पाटील यांनी स्थलांतरित पक्ष्यांना ‘परदेशी देवदूत’ संबोधून पर्यावरण समतोलाचे महत्व पटवून दिले. मात्र काही मोजक्या कविता ज्यात कुशल डरंगे यांची कविता आणि जास्तीत जास्त चारोळीकारांनी ‘ परदेशी देवदूत ‘ अगदी तंतोतंत साकारलेला आहे. जसे…

प्रतिभाताई खोब्रागडे लिहितात…

परदेशी देवदूत घेऊन आला
नव,नवीन उपहार खास…..
मुलांना झाला आनंद फार…
मोठ्यांना नवीन वर्षाचा आभास

खरंय ताई…प्रभू येशूच्या जन्मोत्सवानिमित्त आनंद वाटणारा सांताक्लॉज आणि नवीन वर्षाच्या आगमनाची मोठ्यांची उत्सुकता छानच शब्दबद्ध केली आपण…! सर्वांना नाताळ सणाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…पुन्हा भेटू एका नवीन विषयाच्या परीक्षणासह…तोवर नमस्कार….!

वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles