महाराष्ट्रात मास्क सक्तीच्या हालचाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी घोषणा करणार?

महाराष्ट्रात मास्क सक्तीच्या हालचाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी घोषणा करणार?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई- चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरुय. चीनमध्ये लाखो नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण झालीय. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड्स मिळत नाहीत. अनेकांचा मृत्यू होतोय. त्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडालीय. कोरोनाने काढलेलं हे डोकंवर सर्व जगासाठी डोकंदुखी ठरू शकतं. त्याचपार्श्वभूमीवर आपल्या देशातही आता काळजी घेतली जातेय. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासाठी सर्व राज्यांना अलर्ट देखील केलंय. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये पुजाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आलीय. या मंदिरांमधील मास्कसक्तीच्या बातमीनंतर आता आणखी महत्त्वाची बातमी समोर आलीय. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles