स्व.देवकीबाई बंग मराठी प्राथमिक शाळेत चिमुकल्यांचे नाताळ ‘सिलीब्रेशन’
हिंगणा: नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या अनेक शाळांमध्ये सध्या ‘ख्रिसमस डे’ या सणाची अक्षरश: धूम सुरू असून, नुकतेच क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपल्या असल्याने चिमुकल्यांसाठी आनंदाची पर्वणी म्हणजे ‘नाताळ’ साजरा करण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या स्व.देवकीबाई बंग मराठी प्राथमिक शाळेत चिमुकल्यांचे नाताळ ‘सिलीब्रेशन’ आज दि २४ डिसेंबर २०२२ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. वर्ग १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. रंगबेरंगी कपड्यामध्ये सजून धजून आलेल्या मुलींनी ‘जिंगल बेल्स, जिंगल बेल्स’ या गाण्यावर नृत्य सादर केले.
नृत्य व वेशभूषेबाबत वर्गशिक्षिका छाया बोरकर यांनी मुलींना मार्गदर्शन केले. वर्ग दुसरीच्या विद्यार्थींनीनी सादर केलेल्या या नृत्यात कु. हर्षिता राहुल पाटील, परीधी कोल्हे, माहेश्वरी, वेजीता, स्वरा, चेतना, यांनी सहभाग घेतला.