Home खानदेश ‘मी’ वेगळ्या वाटेवर…न उलगडणारं कोडं;सविता पाटील ठाकरे

‘मी’ वेगळ्या वाटेवर…न उलगडणारं कोडं;सविता पाटील ठाकरे

38

‘मी’ वेगळ्या वाटेवर…न उलगडणारं कोडंपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*अगं आई.. आत्ताच आली कॉलेजमधून.. तुझा मेसेज वाचला आणि लगेचच लिहायला बसली किती ग काळजी करतेस तू माझी. अगं माझ्या पंखात बळ भरणारी तूच आहेस ना… तुझ्या प्रयत्नांमुळेच माझी गगन भरारी आज युरोप पर्यंत पोहोचली, वेगळे कर काहीतरी इतरांपेक्षा.. हा कानमंत्र देणारी तूच ना ग…..*
*बाबांचा प्रचंड विरोध किती लिलया मोडलास तू अन् तोही एकाच दिवसात…*
*साता समुद्रापार मी राहते काळजी तर तुला वाटणारच, पण नको ना अशी कुढत राहूस स्वतःसोबत. प्रवाहासोबत पोहणे तुला आधीपासूनच आवडत नव्हते तेव्हाच तर बालपणापासूनच तू मला प्रवाहाविरुद्ध पोहायला शिकवलेस… किती त्रास झाला तुला याचा, कधीकधी माझा विश्वास डळमळीत व्हायचा, पण तू मात्र किती खंबीर आणि निर्णयक्षम होतीस.*

*आणि हो कुणी काय करते याचे मला काही देणंघेणं नाही,मी कोणत्याही अगदी कोणत्याही बाबतीत वेगळी वाट पकडणार नाही काळजी नको करूस तू.*

*अगं परवा तो आपला वाड्यातला संदीप इथे भेटला, युरोपियन वहिनी पण होती सोबत,मला अप्रूप वाटलं तिचं,छान मराठी बोलण्याचा प्रयत्न करत होती ती ,म्हणाली आम्हा युरोपियन मुलींना तुमच्या भारतीय संस्कृतीचा खूप अभिमान वाटतो,पण दुर्दैव हे की आपल्याला आपलं नाही काही कौतुक …नेहमीच परदेशी संस्कृतीचे अनुकरण..खुज्या विचारांनी वेगळी वाट पकडतो अन् भरकटत जातो.*

*अग, इकडे कुठे मिळते पाहायला आई – मुलीचं असं घट्ट नातं …इथे मुलगी मोठी झाली की ती स्वतःच निर्माण करते वेगळी वाट स्वतःची आणि निर्णयही स्वतःच घेते.*

*बर जाऊदे शेजारचेआजी बाबा कसे आहेत????*
*त्या नवीन सुनबाई ने घराचा खेळ खंडोबा केला ना पार.*
*एवढी वर्षे एकत्र राहणारे बिचारे …तिने वेगळी वाट धरली आणि सारं कुटुंब विस्कटले.*
*आणि हो…तुझी ती विद्यार्थिनी रमा तुझं ऐकलं आणि स्वतःचं आदिवासीपण पूर्णतः झुगारत वेगळी वाट धरली,आणि इथवर पोहोचली.खुश आहे हो ती माझ्यासोबत…काळजी नको करूस.*

*आज बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाने ‘वेगळ्या वाटा’ हा विषय देऊन लिहिण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली.*

*खूप छान सर्वजण व्यक्त झालात कुणी जीवनाच्या वेगळ्या वाटा रंगवल्यात तर कुणी सिंधुताई सपकाळ, सावित्री फुले यांचा संघर्ष नव्या वाटेने पुढे आणला*.
*कुणी नववर्षासाठीच्या नव्या वाट्या शोधल्या तर कुणी माणुसकीच्या वेगळ्या वाटांना महत्त्व दिले. परिस्थिती वर मात करून कुणी संघर्षाची आठवण केली तर कुणी कृतज्ञ बनले.असो सर्वांचे मनस्वी अभिनंदन व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा.*