
एमसीईडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात
हिंगणा: महाराष्ट्र उद्योजकता विकास उपकेंद्र हिंगणा येथे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. गृह उद्योग आणि टेलरिंग प्रशिक्षणार्थी महिलांनी समूह गीत गायन केले. कार्यक्रमाला उपस्थित एमसीईडी च्या लेखपाल कलावती खैरे मैडम,श्री. टाकळे सर प्रशिक्षक योगिता चौधरी, यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मार्गदर्शन केले.या कार्यक्रमा यशाकरिता एमसीईडी केंद्र प्रमुख/ प्रकल्प अधिकारी हेमंत वाघमारे बार्टी समतादूत सतीश सोमकुंवर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाला एमसीईडीचे समन्वयक पंकज ठाकरे, विपीन लाडे, टाकळे सर संगीता ढोने, सुषमा भटकर, प्रशिक्षक योगिता चौधरी, उज्वला डोनारकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक रोशनी नंदेश्वर यांनी केले, तर आभार समन्वयक रोशन मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला गृह उद्योग आणि टेलरिंग प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.