नवीन मराठी शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नवीन मराठी शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर

पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती व सोबतच ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत खास उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिका तनुजा तिकोने यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका मीनल कचरे आणि विद्यार्थिनी अन्वी असोदेकर, स्वरा पानसरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारे मनोगत व्यक्त केले.

प्रत्येक विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन शिक्षण घ्यावे. इतरही मुलींना शिक्षणास प्रवृत्त करावे आणि किमान एका तरी मुलीला शिक्षणात जी होईल ती मदत करावी असे सांगून सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींना ‘बालिका दिना’च्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मुंढे यांनी केले. श्री.धनंजय तळपे यांनी आभार मानले. शाळा समिती अध्यक्ष डॉ प्राची साठे,मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles