
सांगू कशी तुला मी
कळेल का रे कधीतरी
तळमळ या हृदयाची
धडधडते जळते तरी
तार छेडते प्रितीची
तुझ्यामुळेच जाणिव
झाली अक्षय प्रेमाची
फिरवूनी चेहरा जाशी
झुरते उगाच नेमाची
सुकले अधर आणि
नेत्रही झाले कोरडे
नको ओढूस शब्दांनी
हृदयावर आता कोरडे
नको आता अंत पाहू
शेवटची आहे भेट
मागणार नाही काही
हृदयातून हाक थेट
सांगू कशी तुला मी
जळते दिव्यासम आस
नाहीस इथे तरीही वाटे
सर्वत्र मात्र तुझाच भास
सविता धमगाये
नागपूर
=======