परमार्थ कर……

परमार्थ कर……



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

परमार्थ कर । गुप्त ठेव त्यांना ।
दुःख इतरांना । देणे टाळ ।।

वाईट करणे । नियमित त्याग ।
मोह, लोभ, राग । व्यर्थ सारे ।।

व्यर्थ आहे धन । मरण अटळ ।
काय धावपळ । करतोस? ।।

जिथे आहे तिथे । सर्व राहणार ।
देह सोडणार । आत्मज्योत ।।

आतला पाहुणा । निघून गेल्यास ।
नश्वर देहास । मोल कुठे? ।।

म्हणून देहाचा । नको अभिमान ।
ठेव स्वाभिमान । जगण्यात ।।

दिसण्यापेक्षाही । श्रेय असण्याला ।
तुझ्या कर्तव्याला । जाग वेड्या ।।

प्राण्यांची आहुती । दानव मागतो ।
ईश्वर रक्षतो । सगळ्यांना ।।

योग्य काय बघ । योग्य तेच कर ।
अजु जन्मभर । पुण्य कर ।।

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर, उस्मानाबाद
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles