

तरुण पोरं
तरुण वयातली पोरं
जशी नवेली ती नार
उगीच जिवाला घोर
नसे कुणाचा विचार !
पैसे खर्चाला अग्रेसर
भावना मनात आतूर
नाही कधीच रे हार
वागणुकीला ही सुंदर !
मोबाईल प्रवेश द्वार
संकटाला हे कमजोर
गुण हे अवगुण चार
सदा मैत्रीला रे तयार!
जरी नसली रे खबर
सदुपयोग करी बरोबर
अवेळी कुठंही हजर
पारखी नसे ही नजर!
हाती रे यशाची दोर
कलियुगाचे कलाकार
कधी नवा आविष्कार
जपतात रे परोपकार!
चोख असतो व्यवहार
जीवन दयेचा सागर
कसरत करी तारेवर
आयुष्य असे जादूगार!
आता हद्द केलीय पार
बुद्धीने सगळे हुशार
नात्याचा नसतो आदर
अल्लड वयाची पोरं !!
अशोक महादेव मोहिते
कवी,लेखक,सैनिक
बार्शी,जिल्हा सोलापूर