
वेगळ्या वाटा
जीवनात,मार्गक्रमण करताना
प्रगती अन विकासासाठी,
चालाव्या लागतात वेगळ्या वाटा
झुंज दयावी,स्वअस्तित्वासाठी
उतार चढाव जीवनात
प्रत्येकालाच असतात,
म्हणून घाबरून कोणी
जगायचं सोडत नसतात.
जुने सारे आता, गेले बदलून
किती दिवस त्यास चिटकून रहायचे,
अथांग ज्ञान, सुधारणेचीं सुवर्ण संधी
चालून आली,आता त्यास पारखायचे.
संकुचित मनाने
विचार कुंठीत होतात,
व्यापक ज्ञानानें
विचाराच्या कक्षा रुंदावतात.
त्याच त्या,उतार चढावाच्या वाटा चालून,
जगणे असह्य अन निरस होते,
स्वानुभावासाठी चालव्यात नेहमीच वेगळ्या वाटा
तरच आपली, किंमत जनमानसात होते.
मायादेवी गायकवाड
ता.मानवत, परभणी