

दुर्लक्षित मी
मीच केले,
दुर्लक्षित मला
मनाच्या अडगळीत
स्वतः हुन स्वताला….१
चित्रपट जीवनाचा
महानायक मी,
आयुष्याची गाथा
चाळते मी,….२
प्रत्येक पान
अजब आहे,
त्याग,समर्पनाचा
ग्रंथ आहे….३
भूतकाळाच्या खुणा
वेदनेनी व्याकुळल्या
मोजक्याच ऋतुने
मोहरल्या….४
अचंबीत मी
सोंगटी सारीपाटाची
केले दुर्लक्षित मी
क्षण जीवनाचे….५
गाडा संसाराचा
नेटाने रेटला
घराचा उंबरा,
धैर्याने राखला…६
खांब घराचा
आता खचला,
होऊ नये दुर्लक्षित मी
साद घालते,पाखराला…७
काशिनाथ पैठणकर
(नगरसुल)नाशिक