
कळत नकळत
सत्ता आणि संपत्तीचा
चढलाय कुणाला माज ?
समतेच्या गप्पा पोकळ
विकून खाल्ली रे लाज
धर्मनिरपेक्षता नावालाच
जातीवरून गणिते मतांची
समानता फक्त भाषणात
बोटे नाहीत समान हातांची
कळत नकळत हिंदुस्थान
धर्मांधतेच्या गेलाय आहारी
अंधभक्तांचे भरघोस पीक
दरी वाढतेय ग्रामीण-शहरी
हिंदुस्थान म्हणून देशाचा
कळत नकळत होई अपमान
भारत दॕट इज इंडिया हे
स्पष्ट बोलून वाढवा सन्मान
जातीअंताच्या रे लढाईला
कोण देणार सांगा रे गती ?
विचारांची पेटवा रे मशाल
नाहीतर झाडू येईल हाती
नाहीतर झाडू येईल हाती
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर