‘निखारा’कार प्रसिद्ध कवयित्री अर्चना सरोदे ‘साहित्यगंध’ पुरस्काराने सन्मानित
सिलवासा: दादरा नगर हवेली, केंद्रशासित प्रदेश सिलवासा येथील प्रसिद्ध कवयित्री अर्चना सरोदे यांना यंदाचा मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूरच्या वतीने ‘साहित्यगंध पुरस्कार’ नुकताच ‘निखारा’कार कवयित्री सरोदे ताई यांना त्यांच्या निवासस्थानी मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक राहुल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सिलवासा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड, दादरा नगर हवेली’ च्या वतीने आयोजित मराठा जीवन गौरव पुरस्कार, जिजाऊ उत्सव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील उपस्थित होते. दरम्यान समाजसेविका व प्रसिद्ध कवयित्री अर्चना सरोदे यांना त्यांच्या घरी जाऊन साहित्यगंध पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. साहित्यगंध दीपोत्सव अंक, मानपत्र, सन्मानचिन्ह व मेडल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या पुरस्कार व सत्कार प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष व मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे, प्रशांत ठाकरे, अपर्णा ताई व श्रीकांत सरोदे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सरोदे कुटुंबाकडून राहुल पाटील, सविता पाटील ठाकरे व प्रशांत ठाकरे यांना विशेष भेट वस्तू देण्यात आली.