सुरजागड खाणीत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा; डॉ. नामदेव किरसान

सुरजागड खाणीत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा; डॉ. नामदेव किरसानपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गडचिरोली: जिल्ह्यातील सुरजागड खाणीतील खनिज उत्खनन करून बाहेरच्या राज्यातील लोह उद्योगांना विक्री केले जाते. त्याऐवजी जिल्ह्यातच कोनसरी येथे होऊ घातलेला लोह निर्मिती प्रकल्प लायड कंपनीने त्वरित पूर्ण करून उत्खनन केलेल्या खनिजाचा वापर या ठिकाणी करण्यात यावा व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करावे असे डॉ. नामदेव किरसान यांनी आवाहन केले.

दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी मौजा सोमनपल्ली ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे “नजर लागली संसाराला” या दंडारीच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी सुरजागड प्रकल्पाचा समाचार घेताना सांगितले की, सुरजागड येथील खाणीतील खनिजाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक इतर राज्यांमध्ये दररोज होत असते. याचा त्रास जिल्ह्यातील स्थानिक जनतेला सहन करावा लागतो. तसेच एवढी मोठी खाण असून पर्यावरण ऱ्हासाचा त्रास स्थानिक जनतेला सोसावा लागतो परंतु स्थानिक युवकांना तिथे रोजगार मिळत नाही. त्यासाठी जिल्ह्यातच कोनसरी येथे लोह प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे परंतु ते काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. लॉईड मेटल्स कंपनीने अजूनही आवश्यक असलेली पूर्ण जमीन संपादन केली नाही.

स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर सुरजागड येथील खनिज बाहेर राज्यात वाहून न नेता कोनसरी येथील लोह प्रकल्प त्वरित उभारून सुरू करण्यात यावा जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल. या मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या, युवकांच्या समस्या, सिरोंच्या जवळील मेडीगट्टा धरणामुळे नद्यांचे पाणी अडवल्या जाते त्यामुळे नद्यांचे पाणी मागे येऊन शेतात शिरूर शेतीचे व पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, अवागमनाचे रस्ते सुद्धा बंद होतात त्यामुळे स्थानिकांचे फार नुकसान होते.

मेडीगट्टा धरण हे गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिशाप आहे परंतु सरकार या समस्येकडे लक्ष देत नाही. मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे आश्वासन दिले होते परंतु उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे व जनतेचे जीवन आणखी त्रासदायक झालेले आहे. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी नरभक्षी वाघाचा धुमाकूळ, या सर्व समस्या घेऊन 175 किलोमीटर गडचिरोली ते नागपूर पायी यात्रा करून नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनावर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारे 21 डिसेंबर 2023 रोजी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. राहुल जी गांधी सुद्धा देशात पसरलेले जाती धर्माच्या नावावर ध्रुवीकरण, महागाई व बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या इत्यादी दूर व्हाव्यात व देशातील जनतेची मने जुडावीत यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा करीत आहेत. या यात्रेचा समारोप 30 जानेवारी 2023 रोजी जम्मू येथे होणार आहे. काँग्रेस पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, युवकांच्या व सर्वसाधारण जनतेच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंचावर सरपंच नीलकंठ पाटील निखाडे, रजनीकांत मोटघरे, निकेश गद्देवार, प्रेमानंद गोंगले, नितीन खिरटकर, उपसरपंच निलेश मडावी, ग्रामसेवक बांबोळे, ज्योत्स्ना मेडपल्लीवार, मंगलाताई भंडारे व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles