
बडबडगीत…..
तीळ आणि शेंगदाणे
घेतले भाजून भाजून
खलबत्यात घालून
घेतले कुटून कुटून……
कुटलेले तीळ शेंगदाणे
घेतले मग परातीत
गुळही घातला त्यात
तिघे बसले परातीत ऐटीत…..
गोळा केला तिघांचा
बनवला त्याचा लाडू
लाडू देवून एकमेकांना
सर्वांचाच रूसवा काढू….
लाडूने निघेल रूसवा
मनात राहिल गोडवा
चला चला आता हो
पतंगाचा मेळा भरवा…
पतंग घेतील उंच भरारी
उंच उंच उंच गगनात
मांजा सोडेल सखा माझा
ढील देईल रे आनंदात….
वसुधा नाईक,पुणे
=====