आऊसाहेब

आऊसाहेब



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मायभवानी दुर्गामाता
सिंदखेडी हो अवतरली
भोसल्यांची स्नुषा होऊनी
आली लक्ष्मीच्या पाऊली

विद्युलता ही लखलखती
शिवबाची ही जननी
घडविले शिवरायांना
बीज संस्कारांचे पेरूनी

आऊसाहेब मुजरा हा
माझा आदरे आपल्याला
ज्ञान देऊनी सक्षम केले
स्वराज्याच्या विधात्याला

गुलामगिरीच्या छाताडावर
प्रहार करी ही रणरागिणी
स्वत्वाचे स्फुल्लिंग चेतवी
पुत्र शिवरायाच्या मनी

हिंदवी स्वराज्य निर्मिले
वीर धुरंधर शिवरायाने
लाभली या शुभकार्याला
माँ जिजाऊंची आशिर्वचने

तेजाची तू सोनपुतळी गं
संकटांना ना डगमगली
राष्ट्रमाता या माऊलीची
कीर्ती दशदिशी दुमदुमली

रचनाःवृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हाः सांगली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles