आयुष्याच कोरं पान

आयुष्याच कोरं पान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आयुष्य वेचता वेचता राहून गेलं,
आयुष्याचं पान लिहायच
पानगळ सुरू झाली अन् आठवलं की,
अ रे अजून तर खुप आहे जगायचं

किती आणि कसं जगू असं झालं,
होतं तेव्हा वेड्या ह्या मनाला
थांबता थांबत नव्हतं ते सारखं,
भिडू पाहत होतं निळ्या गगनाला

आठवणींची सुंदर फुले भावनांच्या,
रेशमी दोऱ्याने पुन्हा पुन्हा गुंफून
कितीतरी गोष्टींत जगणं झालं होतं,
आपलं मन सारखं सारखं मारून

कालपरवाच कोऱ्या निखळ पानावर ओले
आसवांचे थेंब सुकून गेलेत
बुडवली लेखणी आणि शब्द नकळत
कागदावर अचानक जूळून आलेत

धाव त्याची कुंपनापर्यंत तरी उडण्याची,
आस मात्र भारीच आहे
आयुष्याचे पान जरी कोरे करकरीत,
तरी अजूनही लिहिण्यासाठी हात सरसावत आहेत .

सविता वामन ठाणे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles