
किती बघावी वाट
” दिवसामागून दिवस गेले,
सांग, किती बघावी वाट ”
“आठवणींचा पूर ओसरला,
अश्रूंही डोळ्यासमोर दाट”
“तू येशील ग म्हणून मी ,
स्वप्नांनाही कीती सावरलं ”
“आता तरी तू येशील म्हणून
माझं मनही किती बावरलं”
“तुझ्या एका येण्यानं बघ,
घर किती जाईल आनंदून”
गहिवरून मन येईल बघ
आल्यास तू घरी परतून”
“नाही कोणीही रागावणार,
फक्त तू आम्हांस हवीय”
“एकदाच घे ध्यास येण्याचा
आम्ही तुझी वाट पाहतोय”
“सांग ,किती वाट बघावी,
आता तरी परतीचा मार्ग धर”
“आम्हांला तुझ्या आठवणीने
अश्रूंचा डोळ्यांतून वाहतोय पूर”
हणमंत गोरे
मुपो:घेरडी,ता:सांगोला,जि:सोलापूर