
चकवा
आयुष्यात कधी कधी
चकवा होतो भावनांचा
कोण आपले कोण परके
गोंधळ सारा चुकांचा
का कुणास ठाऊक
कधी वाटते कोणी आपले
असेल जरी ते का
जीवनात या परके
कधी आपल्याच माणसात
होतो असा दुरावा
नाते विणलेच कसे
चकवाच झाला असावा
रोज पावलोपावली
धोका आम्ही खातो
जगण्यापासून जीवन
वंचित आनंद राहतो
नात्यांचे धागे विणताना
विचार जरूर करावा
नाते जुळता एकदा
राहतो चकवा अन् पस्तावा
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड